06 December 2019

News Flash

जालियनवाला बाग हत्याकांडाबाबत कागदपत्रांचे पाकिस्तानात प्रदर्शन

शहीद भगतसिंग यांच्या खटल्याशी संबंधित पुराभिलेखांचे प्रदर्शन भरवले होते.

जालियनवाला बाग हत्याकांडाच्या १०० व्या स्मृतीदिनानिमित्त पाकिस्तानने इतिहासात पहिल्यांदाच या हत्याकांडाबाबतच्या दुर्मीळ कागदपत्रांचे प्रदर्शन भरवले आहे. जालियनवाला बाग नरसंहार आणि पंजाबमध्ये एप्रिल १९१९ मध्ये लागू करण्यात आलेला मार्शल लॉ यांच्याशी संबंधित सुमारे ७० ऐतिहासिक दस्ताऐवज असलेले सहा दिवसांचे हे प्रदर्शन येथील लाहोर हेरिटेज म्युझियममध्ये शनिवारी सुरू झाले. एका वर्षांपूर्वी पाकिस्तानने क्रांतिकारी नेते शहीद भगतसिंग यांच्या खटल्याशी संबंधित पुराभिलेखांचे प्रदर्शन भरवले होते.

निरनिराळ्या ऐतिहासिक घटना आणि प्रख्यात व्यक्तिमत्त्वे यांचे पुराभिलेख प्रदर्शित करण्याचे सरकारने ठरवले आहे, जेणेकरून त्या काळात काय घडले हे लोकांना कळावे, असे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतिक सरकारच्या पुराभिलेख विभागाचे संचालक अब्बास चुगताई यांनी पीटीआयला सांगितले.

जालियनवायाला बाग नरसंहाराचे शताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी पुराभिलेखातील कागदपत्रे प्रदर्शित करण्यात आली असून, आगामी काळातही ही प्रथा सुरू राहील. यानंतर रुडयार्ड किपलिंग यांच्या साहित्याशी संबंधत कागदपत्रे प्रदर्शित करण्याचेही नियोजन आम्ही करत आहोत, असे चुगताई म्हणाले.

First Published on April 22, 2019 1:25 am

Web Title: pakistan puts on display documents of jallianwala bagh massacre
Just Now!
X