26 January 2020

News Flash

पाकिस्तान 7 लाँच पॅडवरून 275 जिहादी भारतात घुसवण्याच्या तयारीत

भारताविरोधात काश्मीर खोऱ्यात प्रॉक्सी वॉरदरम्यान पाकिस्तानने हा डाव खेळला होता.

प्रातिनिधीक छायाचित्र

काश्मीरच्या मुद्द्यावर सर्वच ठिकाणी तोंडावर पडल्यानंतरही पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर दहशतवादी तळ पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. यासोबतच 7 लाँचपॅड तयार करण्यात आले असून 275 दहशतवादी सक्रिय झाले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. याव्यतिरिक्त जम्मू काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी अफगाण आणि पश्तून सैनिकही तैनात करण्यात येत आहे. पुढील महिन्यात दहशतवादी कारवायांवर नजर ठेवणारी फायनॅन्शिअल अॅक्शन टास्क फोर्स पाकिस्तानच्या भवितव्यावर निर्णय घेणार आहे. अशाच परिस्थितीत पाकिस्तानकडून कुरापती सुरू आहेत.

यापूर्वीही 1990 च्या दशकात पाकिस्तानने परदेशी मुलांचा काश्मीरमध्ये हिंसा भडकावण्यासाठी आणि दहशतवाद पसरवण्यासाठी वापर केला होता. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. भारताविरोधात काश्मीर खोऱ्यात प्रॉक्सी वॉरदरम्यान पाकिस्तानने हा डाव खेळला होता. भारताने जेव्हा दशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली तेव्हा पाकिस्तानने आपली रणनिती बदलली.

पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय मिळून भारताविरोधात कारवाया करण्यासाठी संपूर्ण ताकद लावत आहेत. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तान दशतवाद्यांना तयार करत आहे. तसंच लाँचपॅडही उभारण्यात येत आहे. तसंच दहशतवादी काश्मीरमधील गुरेज सेक्टरमधून भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहितीही समोर आली आहे.

First Published on September 11, 2019 11:29 am

Web Title: pakistan ractives 7 launch pad 275 jihadi active near loc intelligence report jud 87
Next Stories
1 हद्द झाली… दंड म्हणून ट्रक चालकाने भरले एक लाख ४१ हजार ७०० रुपये
2 ‘आमच्या मुलीच्या लग्नाला यायचं हं!’, सामान्य कुटुंबाने मोदींना पाठवले आमंत्रण; मोदी म्हणाले…
3 पत्रकाराला दिलेल्या डॉ. सिवन यांच्या उत्तराने जिंकलं देशवासीयांचं मन
Just Now!
X