News Flash

अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानचा रॉकेट हल्ला; ९ जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानकडूही प्रत्युत्तरात कारवाई

प्रतीकात्मक छायाचित्र

गुरूवारी पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या ९ लोकांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाक़डून याबाबत माहिती देण्यात आली. तर दुसरीकडे अफगाणिस्ताननं पहिल्यांदा पाकिस्तानवर हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यान सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान, पाकिस्ताननं आपल्या सीमेवरून अफगाणिस्तानमधी सीमेनजीक असलेल्या शहरावर रॉकेट हल्ला केला. अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी हा दावा केला. या नंतर दोन्ही देशांमध्ये तणाव अधिक वाढला असून अफगाणिस्ताननं आपल्या लष्कराला आणि हवाई दलाला हाय अलर्टवर ठेवलं आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्ताननं पहिल्यांदा पाकिस्तावर हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला. “पाकिस्ताननं गुरूवारी स्पिनबोल्डकमध्ये रॉकेट हल्ले केले. त्यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला तर ५० जण जखमी झाले. या घटनेनंतर अफगाणिस्ताननंदेखील त्यांना प्रत्युत्तर देत कारवाई केली,” अशी माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली.

“अफगाणिस्तानच्या सैन्यानं निर्दोष सामान्य नागरिक आणि पाकिस्तानच्या संरक्षण दलाच्या जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर पाकिस्ताननं त्यांना प्रत्युत्तर दिलं. परंतु यानंतर राजकीय आणि लष्कराच्या पातळीवर तणाव कमी करण्यात आला,” अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 8:39 am

Web Title: pakistan rocket attack on afghanistan 9 people died 50 people injured jud 87
Next Stories
1 करोनाचा कहर : जुलै महिन्यात देशात ११ लाख रुग्णांची नोंद
2 परीक्षा होणारच!
3 पंजाबमध्ये विषारी दारूमुळे २१ जणांचा मृत्यू
Just Now!
X