News Flash

शियांच्या हत्याकांडाप्रकरणी बलुचिस्तान सरकार बरखास्त

क्वेट्टा भागात झालेल्या सुमारे १०० शियांच्या हत्याकांडाच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांनी बलुचिस्तान सरकार बरखास्त केले असून तेथे राज्यपालांची राजवट लागू केली आहे.

| January 15, 2013 01:03 am

क्वेट्टा भागात झालेल्या सुमारे १०० शियांच्या हत्याकांडाच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांनी बलुचिस्तान सरकार बरखास्त केले असून तेथे राज्यपालांची राजवट लागू केली आहे. या नृशंस हत्याकांडाचा निषेध या भागात राहणाऱ्या जनतेकडून करण्यात येत होता.
गेल्या गुरुवारी एका शक्तिशाली स्फोटाद्वारे ९८ शिया पंथीयांची हत्या करण्यात आली होती, तसेच या स्फोटामध्ये १२० जण जखमी झाले होते. हत्या करण्यात आलेल्या शियांच्या मृतदेहांसह हजारो शिया पंथीय निषेध मोर्चामध्ये सामील झाले होते. जोपर्यंत बलुचिस्तान सरकार बरखास्त केले जात नाही तोपर्यंत मृतदेहांचा दफनविधी करण्यास आंदोलनकर्त्यांनी ठाम नकार दिला.
या सर्व पाश्र्वभूमीवर बैठकीत पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांनी बलुचिस्तान सरकार बरखास्तीचा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 1:03 am

Web Title: pakistan sacks baluchistan government
टॅग : Pakistan
Next Stories
1 स्वतंत्र तेलंगणा लवकरच?
2 अलाहाबाद येथे कुंभमेळ्याला सुरुवात
3 ‘आरएसएस’ फीडचा निर्माता अॅरॉन स्वाट्र्झ याची आत्महत्या
Just Now!
X