News Flash

आम्ही काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना पाठिंबा देणारच; पाकिस्तानची दर्पोक्ती

काश्मीरी जनतेला स्वयंनिर्णयाचा हक्क मिळावा.

| June 27, 2017 07:51 pm

Pakistan says will continue to extend support to separatists in Kashmir : काश्मीरी जनतेला स्वयंनिर्णयाचा हक्क मिळावा आणि संयुक्त राष्ट्रांनी आखून दिलेल्या ठरावानुसार काश्मीर वादावर तोडगा निघावा, यासाठी आम्ही पाठिंबा देत असल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकारिया यांनी सांगितले.

अमेरिकेने हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी सय्यद सलाऊद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अमेरिकेकडून ही घोषणा करण्यात आली होती. मात्र, पाकिस्तानने आज सय्यद सलाऊद्दीनची पाठराखण करत अमेरिकेचा निर्णय अयोग्य असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे सय्यद सलाऊद्दीन काश्मीरी जनतेच्या हक्कांसाठी लढत असल्याचा अप्रत्यक्ष जावईशोधही पाकिस्तानकडून लावण्यात आला आहे. अशा लोकांना दहशतवादी घोषित करणे पूर्णपणे अयोग्य आहे. त्यामुळे आम्ही भविष्यात काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना राजकीय, राजनैतिक आणि नैतिक अशा सर्व पातळ्यांवर पाठिंबा देऊ, अशी दर्पोक्ती पाकने केली आहे. काश्मीरी जनतेला स्वयंनिर्णयाचा हक्क मिळावा आणि संयुक्त राष्ट्रांनी आखून दिलेल्या ठरावानुसार काश्मीर वादावर तोडगा निघावा, यासाठी आम्ही हा पाठिंबा देत असल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकारिया यांनी सांगितले. दरम्यान, सय्यद सलाऊद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा अमेरिकेचा निर्णय भारताच्या दहशतवादविरोधी रणनीतीच्यादृष्टीने एक मोठे यश मिळाल्याचे मानले जाते आहे.

मोदी-ट्रम्पची यारी इराणच्या जिव्हारी?, काश्मीर हिंसाचारात भारताला म्हटले अत्याचारी

तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आजच्या भेटीनंतर इराणनेही नाराजी व्यक्त केली आहे. इराणने काश्मीरचा मुद्दा उपस्थित करुन भारताला चिमटा काढला आहे. जगभरातील मुस्लिमांनी बहारिन, काश्मीर आणि येमेनमधील जनतेला अत्याचारी हुकूमशहांविरोधात साथ द्यावी असे आवाहन इराणमधील सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खोमेनी यांनी केले आहे. खोमेनी यांच्या विधानामुळे भारत आणि इराणमधील संबंधांमध्ये कटूता आणखी वाढण्याची शक्यता आहे.भारत आणि इराणमधील संबंधांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कच्चा तेलाचा पुरवठा आणि नैसर्गिक वायू साठ्यांवरुन तणाव निर्माण झाला आहे. यात भर म्हणजे आता खोमेनी काश्मीरचा मुद्दा मांडून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

दहशतवादाला थारा देऊ नका; ट्रम्प-मोदींनी पाकला ठणकावले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2017 7:44 pm

Web Title: pakistan says will continue to extend support to separatists in kashmir terming syed salahuddin global terrorist completely unjustified pakistan
Next Stories
1 बलात्काराच्या आरोपाखाली तुरूंगात असलेल्या माजी मंत्र्याची मुलायमसिंहाकडून पाठराखण
2 Panama case: पाक पंतप्रधान नवाज शरीफांची कन्या मरिअम चौकशीच्या जाळ्यात
3 गुगलकडून सर्च रिझल्टमध्ये फेरफार; EU कडून २४२ कोटी युरोंचा दंड
Just Now!
X