13 July 2020

News Flash

पाकिस्तानला भारताची वीज हवी

पाकिस्तानने आपली विजेची गरज भागवण्यासाठी चक्क भारताकडून वीज आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या कराराबाबत दोन्ही शोमध्ये दीर्घ चर्चा झाली असून लवकरच त्याला अंतिम रूप

| March 21, 2014 03:40 am

पाकिस्तानने आपली विजेची गरज भागवण्यासाठी चक्क भारताकडून वीज आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या कराराबाबत दोन्ही शोमध्ये दीर्घ चर्चा झाली असून लवकरच त्याला अंतिम रूप देण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.
भारतातून तब्बल १,२०० मेगाव्ॉट वीज आयात करण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने पाकिस्तान हा प्रकल्प राबविणार आहे.  याबाबत नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या बैठकीत भारतीय अधिकाऱ्यांकडे याबाबतचा मसुदा सुपूर्द करण्यात आला आहे. या मसुद्याचा अभ्यास करून भारताच्या वतीने निर्णय घेतला जाईल, असेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानला ५०० मेगाव्ॉट वीज निर्यात करण्याबाबतच्या शक्यतेवर भारत-पाकिस्तानच्या तज्ज्ञांचा समावेश असलेला गट अभ्यास करीत आहेत. भारताकडून वीज घेण्याबाबत निर्णय पाकिस्तान सरकारने  जानेवारी महिन्यात घेतला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात वीज व्यापार सुरू करण्यास पाकिस्तान सरकारने मंजुरी दिल्याचे सरकारी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2014 3:40 am

Web Title: pakistan seeks power supply from india
Next Stories
1 व्हिडिओ: ‘स्पाईसजेट’मध्ये होळी सेलिब्रेशन!, दोन वैमानिक निलंबित
2 अफगाणिस्तानातील आत्मघातकी हल्ल्यात १७ ठार
3 खालिदा झिया यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी ठपका
Just Now!
X