भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. भारतावर दबाव आणण्यासाठी पाकिस्तान सर्व स्तरांमधून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांचा प्रत्येक डाव त्यांच्यावर उलटा पडत असल्याचे दिसत आहे. असाच एक प्रकार पुन्हा समोर आला आहे. यावेळेस पाकिस्तान सिनेटचे सदस्य रेहमान मलिक यांनी भारतावर टिका करताना मोठा गोंधळ घालता आहे. पाकिस्तानमधील माजी मंत्री असणाऱ्या मलिक यांनी ट्विटवरुन भारतावर टीका करताना मलिक यांनी संयुक्त राष्ट्रांचे म्हणजेच युनायडेट नेशन्सचे ट्विटर हॅण्डल टॅग करण्याऐवजी उनो गेमचे ट्विटर हॅण्डल टॅग केले आहे.

मलिक यांनी एएनआय या वृत्तसंस्थेचे ट्विट रिट्विट करुन कोट करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. श्रीनगरमधील परिस्थितीवर भाष्य करणारे ट्विट कोट करुन याकडे दखल द्या असं सांगताना मलिक यांनी पंतप्रधान मोदी आणि उनो गेमच्या ट्विटर अकाउंटला टॅग केले.

संयुक्त राष्ट्रांऐवजी उनोकडे पंतप्रधान मोदींची तक्रार करणाऱ्या मलिक यांची नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. याच गोंधळावरुन भारतीयांनी मलिक आणि पाकिस्तानवर मजेशीर टिका केली आहे.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२)

१३)

१४)

१५)

दरम्यान, भारताविरुद्ध अपप्रचार करण्यासाठी पाकिस्तानकडून जुन्या व्हिडिओचा वापर करण्यात येत असल्याचे याआधीच उघडकीस आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हिंसा होत असल्याचा खोटा आरोप करत पाकिस्तानमध्ये जुन्या घटनांचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. मलिक यांनी घातलेल्या गोंधळामुळे पाकिस्तानवर पुन्हा एकदा नामुष्की ओढावली आहे.