दहशतवादी कारवायांशी लागेबांधे असलेल्या शाळांवरील कारवाईचा भाग म्हणून पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी देशभरातील संशयित आणि नोंदणी न झालेले असे २५४ मदरसे बंद केले आहेत.
सिंध प्रांतातील १६७, खैबर पख्तुन्ख्वातील १३ व पंजाबमधील २ संशयित मदरसे, तसेच सिंधमधील नोंदणी न करण्यात आलेले ७२ मदरसे बंद करण्यात आले असल्याचे अंतर्गत विभागाचे राज्यमंत्री बलिगुर रहमान यांनी नॅशनल असेंब्लीला सांगितले.
दहशतवादाला आळा घालण्यासाठीच्या राष्ट्रीय कृती कार्यक्रमांतर्गत वांशिक हिंसाचार नियंत्रणात आणण्याकरता सरकार करत असलेले प्रयत्न, त्यांची अंमलबजावणी आणि १६ फेब्रुवारीपर्यंत या मोहिमेचे निष्पन्न याबद्दल असल्याची माहिती रहमान यांनी दिली.