06 July 2020

News Flash

पाकिस्तानकडून भारतासोबतची टपाल सेवा बंद

आंतरराष्ट्रीय निकषांचे उल्लंघन झाल्याचा भारताचा आक्षेप

| October 22, 2019 12:30 am

आंतरराष्ट्रीय निकषांचे उल्लंघन झाल्याचा भारताचा आक्षेप

नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताबरोबरची टपाल सेवा बंद केली असून  या निर्णयाने आंतरराष्ट्रीय निकषांचे उल्लंघन झाल्याची टीका भारताने केली आहे. पाकिस्तानच्या या निर्णयाने दोन्ही देशातील संबंध आणखी खालच्या पातळीवर आले आहेत.

पाकिस्तानने भारतातून आलेले टपाल २७ ऑगस्टपासून स्वीकारलेले नाही व तेथूनही टपाल पाठवलेले नाही. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानने टपालसेवा बंद केली आहे. केंद्रीय दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी सांगितले, की पाकिस्तानने टपाल सेवा बंद करण्याचा निर्णय एकतर्फी घेतला असून त्याची पूर्वसूचना भारताला दिली नाही. पाकिस्तानच्या या निर्णयाने जागतिक टपाल संघटनेच्या निकषांचे उल्लंघन झाले आहे, पण पाकिस्तान हा शेवटी पाकिस्तान आहे. प्रसाद म्हणाले, की पाकिस्तानने दोन महिन्यांपासून टपाल सेवा थांबवली आहे. पाकिस्तानने कुठलीही सूचना न देता टपाल सेवा थांबवली. जागतिक टपाल संघटनेअंतर्गत ही सेवा चालवली जात असते. पण पाकिस्तानने कुणालाही न कळवता ही सेवा बंद केली.

अनुच्छेद ३७० रद्द केल्याचा परिणाम

फाळणी, युद्ध व सीमेवरील तणावानंतरही भारत पाकिस्तान यांच्यातील टपाल सेवा कधी बंद झाली नव्हती. पण आता भारताने कलम ३७० रद्द केल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने ती बंद केली आहे.

दहशतवादी छावण्या नष्ट केल्याचा भारताचा दावा पाकिस्तानला अमान्य

इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरमध्ये तीन दहशतवादी छावण्या उद्ध्वस्त केल्याचा भारताचा दावा पाकिस्तानी लष्कराने फेटाळला आहे. भारताने परदेशी राजनैतिक अधिकारी किंवा प्रसारमाध्यमांच्या मदतीने येथे भेट देऊन आपला दावा सिद्ध करावा, असे आव्हानही पाकिस्तानने दिले.

लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी  रविवारी असे सांगितले होते की, भारताने तंगधर व केरण क्षेत्राच्या समोरील भागात पाकव्याप्त काश्मीरमधील तीन दहशतवादी छावण्या उद्ध्वस्त केल्या आहेत, या कारवाईत पाकिस्तानचे सहा ते दहा सैनिकही मारले गेले आहेत. आणखी एक दहशतवादी छावणी भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत उद्ध्वस्त झाली असून त्यामुळे प्रत्यक्ष ताबा रेषेपलीकडे दहशतवादी कारवायांसाठी उभारण्यात आलेल्या यंत्रणेला मोठा हादरा बसला आहे.

रावत यांच्या दाव्याला उत्तर देताना पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असीफ गफूर यांनी मध्यरात्री ट्विटरवर  म्हटले आहे की, रावत यांचे दावे खोटे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 12:30 am

Web Title: pakistan stops postal service to india zws 70
Next Stories
1 EXIT POLL: हरियाणात भाजपाला स्पष्ट बहुमत!
2 Exit Poll: एक्झिट पोल निकालाचं चित्र स्पष्ट करतात का?
3 गुड न्यूज… जवान कुटुंबासोबत दरवर्षी घालवणार शंभर दिवस; अमित शाहांचे दिवाळी गिफ्ट
Just Now!
X