News Flash

‘वेलकम पार्टी’ बेतली जिवावर, इस्लामविरोधी कृत्य ठरवत विद्यार्थ्याने केली प्राध्यापकाची हत्या

बहावलपूर येथील सादिक महाविद्यालयात प्रा. खालिद हमीद हे इंग्रजी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. खालिद हमीद हे पुरोगामी विचारांचे होते.

संग्रहित छायाचित्र

पाकिस्तानमधील बहावलपूर येथे महाविद्यालयातील नवीन विद्यार्थ्यांसाठी पार्टीचे आयोजन करणे एका प्राध्यापकाच्या जिवावर बेतले आहे. या पार्टीसाठी प्राध्यापकाने महिला प्राध्यापक आणि विद्यार्थिनींनाही निमंत्रण दिल्याने महाविद्यालयातील एक विद्यार्थी नाराज झाला. हे इस्लामविरोधी कृत्य असल्याचे सांगत त्याने प्राध्यापकावर चाकूने हल्ला केला असून या हल्ल्यात प्राध्यापकाचा मृत्यू झाला आहे.

बहावलपूर येथील सादिक महाविद्यालयात प्रा. खालिद हमीद हे इंग्रजी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. खालिद हमीद हे पुरोगामी विचारांचे होते. त्यांनी महाविद्यालयातील नवीन विद्यार्थ्यांसाठी वेलकम पार्टीचे आयोजन करण्याचे ठरवले. या पार्टीत त्यांनी महिला प्राध्यापक आणि विद्यार्थिनींनाही प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. २१ मार्च रोजी ही पार्टी होणार होती. मात्र, खालिद हमीद यांच्या या निर्णयावर त्यांच्या विभागातील एक विद्यार्थी नाराज झाला. खातीब हुसैन असे विद्यार्थ्याचे नाव असून तो बीएसच्या तृतीय वर्षात शिकत होता.

खालिद हमीद यांनी वेलकम पार्टीचे आयोजन करुन इस्लामविरोधी कृत्य केल्याचे त्याचे म्हणणे होते. बुधवारी सकाळी खालिद हमीद आणि त्यांचा मुलगा कारने महाविद्यालयात पोहोचले. त्यांचा मुलगा कार पार्क करत होता. तर खालिद हमीद हे कार्यालयाच्या दिशेने गेले. कार्यालयात जाताना खातीब हुसैनने त्यांना गाठले आणि चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर खातीब हुसैन ओऱडत होता. इस्लामविरोधी कृत्य केल्याची ही शिक्षा होती, असे तो म्हणत होता. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या खालिद हमीद यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोवर त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी खातीबला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 9:30 am

Web Title: pakistan student stabs professor to death for planning welcome party inviting woman in bahawalpur
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटीन: पाच महत्त्वाच्या बातम्या
2 PNB Scam: सतर्क बँक कर्मचाऱ्यामुळेच पोलिसांच्या जाळ्यात अडकला नीरव मोदी
3 CRPF मधील जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, तिघांचा मृत्यू
Just Now!
X