News Flash

संपूर्ण पाकिस्तानची मदार फक्त एका पाणबुडीवर, सुरक्षेसाठी पूर्णपणे चीनवर अवलंबून

पाकिस्तानी नौदल सध्या अवघ्या एका पाणबुडीवर अवलंबून आहे. त्यामुळे पाकिस्तानी नौदलाच्या क्षमतेमध्ये मोठया प्रमाणावर घट झाली आहे.

पाकिस्तानी नौदल सध्या अवघ्या एका पाणबुडीवर अवलंबून आहे. त्यामुळे पाकिस्तानी नौदलाच्या क्षमतेमध्ये मोठया प्रमाणावर घट झाली आहे. पाकिस्तानी नौदलाकडे पाच पाणबुडया आहेत. त्यातील चार पाणबुडयांची दुरुस्ती सुरु आहे. तीन गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी नौदलाची फक्त एक पाणबुडी कार्यरत आहे. त्यामुळेच पुलवामा हल्ल्यानंतर आपल्या समुद्री हितांच्या रक्षणासाठी ते कुठल्याही परिस्थिती चिनी नौदलाकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न करत होते असे एका गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले.

१४ फेब्रुवारीला जैशच्या दहशतवाद्याने पुलवामा येथे स्फोटकांनी भरलेले वाहन सीआरपीएफच्या ताफ्यातील बसला धडकवले होते. यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. त्यानंतर २६ फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाने जैश-ए-मोहम्मदच्या पाकिस्तान बालकोटमधील तळावर एअर स्ट्राइक केला. ज्यामध्ये अनेक दहशतवादी, त्यांच्या ट्रेनर्सचा खात्मा झाला.

एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारीला भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आंतरराष्ट्रीय समुद्रात पाकिस्तानी पाणबुडीच्या हालचाली दिसल्या होत्या. पाकिस्तानकडून असलेला धोका अजूनही टळलेला नाही. भारतीय नौदल पूर्णपणे सज्ज असून परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण आहे असे वरिष्ठ नौदल अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

पाकिस्तानकडे पाच फ्रेंच बनावटीच्या पाणबुडया आहेत. यातील तीन पाणबुडया ऑगस्टा ९० बी क्लास किंवा खालिद क्लासच्या आहेत. दोन ऑगस्टा ७० किंवा हशमत क्लासच्या आहेत. पीएनएस खालीद २० वर्ष तर पीएनएस साद १८ वर्ष जुनी आहे. पीएनएस हमझा ११ वर्षांपूर्वी सेवेत दाखल झाली. टर्कीश कंपनीने या तीन पाणबुडयांची दुरुस्ती केली असून २०२० पर्यंत त्या पूर्णपणे कार्यरत होतील.

खालिद क्लास पाणबुडीमध्ये क्रूझ क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार १९८० च्या सुमारास दाखल झालेली पीएनएस हरमत फक्त काही प्रमाणात कार्यरत आहे. १९७९ च्या सुमारास दाखल झालेल्या पीएनएस हशमतची दुरुस्ती सुरु आहे. पाणबुडया संघर्षाच्या काळात शत्रूवर धाक ठेवण्यात तसेच समुद्रात मोक्याच्या ठिकाणी शत्रूच्या युद्ध जहाजांना तैनात होण्यापासून रोखण्यात महत्वाची भूमिका बजावतात. शत्रूच्या बंदरावरुन चालणाऱ्या व्यवहारात अडथळे आणून आर्थिक नुकसानही करता येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 5:45 pm

Web Title: pakistan submarine force down only 1 of 5 is partially operational
Next Stories
1 चंद्रकांत पाटील दोन नंबरचे मंत्री – राजू शेट्टी
2 सिद्धेश्वर महाराजांच्या वक्तव्यावर मोदी, फडणवीस, अमित शाह, दानवे यांनी माफी मागावी – नवाब मलिक
3 आचारसंहिता म्हणजे काय?
Just Now!
X