News Flash

डॅनियल पर्ल प्रकरणातील मुख्य आरोपींंना दोषी सिद्ध करण्यात फिर्यादी पक्ष अपयशी, पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाची टीका

डॅनियल पर्ल, हे वॉल स्ट्रीट जर्नलचे दक्षिण आशिया ब्यूरोचे प्रमुख होते

छायाचित्र सौजन्य: इंडियन एक्सप्रेस

२००२ मध्ये अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल याचे अपहरण करण्यात आले होते नंतर त्याचा खून करण्यात आला होता. डॅनियल पर्ल, हे वॉल स्ट्रीट जर्नलचे दक्षिण आशिया ब्यूरोचे प्रमुख होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी अल कायदाचा अतिरेकी अहमद उमर सईद शेख हा जन्माने ब्रिटीश आहे. या आरोपीचा दोष सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याबद्दल पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने फिर्यादी पक्षावर टीका केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी न्यायाधीश सरदार तारिक मसूद यांनी तयार केलेला ४३ पानांचा सविस्तर निकाल जाहीर केला. मसूद हे तीन सदस्यीय खंडपीठाचे सदस्य होते.

डॉन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार न्यायाधीशांनी असा दावा केला आहे की, खटल्याच्या दरम्यान सादर केलेले पुरावे तथ्यात्मकदृष्या आणि कायदेशीरबाबींनी अपूर्ण आहेत.

२ ८ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने उमर शेख आणि इतरांना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले होते तसेच मुख्य संशयित तसेच फहाद नसीम अहमद, सय्यद सलमान साकीब आणि शेख मोहम्मद आदिल यांची इतर कोणत्याही खटल्याच्या संदर्भात ताब्यात ठेवण्याची आवश्यकता नसल्यास सुटका करण्याचे आदेश दिले होते.

जैश-ए-मोहम्मद (जेईएम) प्रमुख मसूद अझर आणि मुश्ताक अहमद जरगर यांच्यासमवेत शेख यांना १९९९ मध्ये सोडण्यात आले होते. यानंतर तीन वर्षांनी डॅनियल पर्ल यांची हत्या करण्यात आली होती.
सिंध उच्च न्यायालयाने २ एप्रिल २०२० रोजी अमेरिकेच्या पत्रकार पर्लचे अपहरण आणि खून प्रकरणात दोषी ठरलेल्या शेखची फाशीची शिक्षा रद्द करून सात वर्षे केली होती आणि या प्रकरणासाठी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या इतर तिघांना देखील निर्दोष मुक्त केले होते.

सर्वोच्च न्यायालयाने २८ जानेवारी रोजी विभागीय आदेश जारी करताना अधिकाऱ्यांना आरोपींना सोडण्याचे आदेश दिले होते. खंडपीठाचे तिसरे सदस्य न्यायमूर्ती याह्या आफ्रिदी हे बहुमताच्या मताशी सहमत नव्हते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 1:59 pm

Web Title: pakistan supreme court says prosecution failed to prove guilt of main accused in daniel pearl case sbi 84
Next Stories
1 टीएमसीची निवणूक आयोगाला मतदानाच्या प्रक्रियेत लक्ष घालण्याची विनंती
2 जेव्हा शशी थरूर नरेंद्र मोदींना सॉरी म्हणतात…
3 करोना पुन्हा बळावतोय? भारतात गेल्या पाच महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ
Just Now!
X