शिया पंथीयातील चेहलूम सणानिमित्त खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारी संपूर्ण पाकिस्तानमधील मोबाईल सेवा बंद ठेवण्यात आली आहे. पाकिस्तानमधील २२ शहरांमधील मोबाईल सेवा मंगळवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन ऍथोरिटीने मोबाईल सेवा देणाऱया कंपन्यांना दिले आहेत.
चेहलूमच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुरेशी खबरदारी घेण्यात आली आहे. लष्कराचे दहा हजार जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले असून, ते स्थानिक प्रशासनासोबत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करीत आहेत. अतिसंवेदनशील शहरांमध्ये गरज पडल्यास निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्याची तयारीही ठेवण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.