News Flash

पाकिस्तानने घातली PUBG गेमवर बंदी, कारण…

पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन ऑथोरिटीचा निर्णय

पाकिस्तानने बुधवारी लोकप्रिय ऑनलाइन बॅटल गेम ‘प्लेयर अननोन बॅटलग्राउंड’ (Player Unknown’s Battle grounds) अर्थात पब्जीवर बंदी घातली. समाजाच्या विविध स्तरांतून या गेमबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर गेमवर तात्पुरती बंदी घातल्याची माहिती पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन ऑथोरिटीने (पीटीए) ट्विटरद्वारे दिली आहे.

हा गेम एखाद्या व्यसनाप्रमाणे असून यामुळे मुलांच्या शारिरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर नकारात्मक परिणाम होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये पब्जीमुळे तरुणांनी आत्महत्या केल्याचं वृत्तही आलं होतं. त्यानंतर गेमवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचं पीटीएने म्हटलं आहे. पब्जी गेम प्लेयर्सच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं पीटीएने नमूद केलं आहे.


लाहोर उच्च न्यायालयात ९ जुलै रोजी पब्जी गेमबाबत सुनावणी होणार आहे. सध्या गेम साठीचा इंटरनेट अॅक्सेस बंद करण्यात आला आहे, असं पीटीएकडून सांगण्यात आलं. पाकिस्तानशिवाय जॉर्डन, इराक, नेपाळ, इंडोनेशियातील काही भाग आणि भारताच्या गुजरातमध्येही पब्जीवर बंदी घालण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 3:24 pm

Web Title: pakistan temporarily bans pubg after receiving complaints sas 89
Next Stories
1 गांजाचं नामकरण मेथी केलं नाही म्हणजे मिळवलं; अखिलेश यादवांनी काढला चिमटा
2 करोनावर प्रभावी ठरतेय ‘ही’ दीड रुपयांची गोळी?; डॉक्टरांचा दावा ऐकून हैराण व्हाल
3 करोनावर लागू पडलेल्या रेमडेसिविर औषधाबद्दल चिंता वाढवणारी बातमी
Just Now!
X