23 September 2020

News Flash

कराचीत चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला, दोन पोलिसांचा मृत्यू

शुक्रवारी सकाळी तीन दहशतवाद्यांनी दुतावासात घुसण्याचा प्रयत्न केला. एका कारमधून हे तिन्ही दहशतवादी दुतावासाच्या आत घुसण्याच्या प्रयत्नात होते.

कराचीतील क्लिफ्टन ब्लॉक - ४ येथे चीनचे दुतावास आहे.

पाकिस्तानमधील कराची येथे चीन दुतावासाबाहेर दहशतवादी हल्ला झाला असून या हल्ल्यात दुतावासाबाहेर तैनात असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार मारले आहे. या घटनेनंतर कराचीत बंदोबस्त वाढवण्यात आला असून चीन दुतावासातील अधिकारी व कर्मचारी सुखरुप आहेत.

कराचीतील क्लिफ्टन ब्लॉक – ४ येथे चीनचे दुतावास आहे. शुक्रवारी सकाळी तीन दहशतवाद्यांनी दुतावासात घुसण्याचा प्रयत्न केला. एका कारमधून हे तिन्ही दहशतवादी दुतावासाच्या आत घुसण्याच्या प्रयत्नात होते. दुतावासाबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी ही कार थांबवण्याचा प्रयत्न केला. कारमधील दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार केला. यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

सुरक्षा दलांनीही दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात तिन्ही दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. कारमध्ये स्फोटक पदार्थ मोठ्या प्रमाणात होते. पोलिसांनी शस्त्रसाठा आणि बॉम्ब जप्त केले आहेत. या घटनेनंतर चीन दुतावासाबाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या दुतावास खाली करण्यात आले असून दुतावासाकडे जाणारे सर्व मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. दुतावासातील सर्व अधिकारी व कर्मचारी सुरक्षित असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 11:46 am

Web Title: pakistan terrorist attack outside chinese consulate karachi policemen terrorist
Next Stories
1 समाजाच्या भावना दुखावणारे विधान करु नका; राहुल गांधींची नेत्यांना तंबी
2 बेरोजगारीला कंटाळून चार तरुणांची ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या
3 धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार ब्राह्मणांनाच, मोदी किंवा उमा भारतींना नाही : काँग्रेस नेता
Just Now!
X