News Flash

हत्फ-९ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

पाकिस्तानने आज हत्फ ९ ऊर्फ नस्र या कमी पल्ल्याच्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

| November 6, 2013 04:35 am

पाकिस्तानने आज हत्फ ९ ऊर्फ नस्र या कमी पल्ल्याच्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्राचा पल्ला ६० किलोमीटरचा आहे. अत्याधुनिक अशा मल्टीटय़ूब लाँचरच्या मदतीने ही चाचणी घेण्यात आली. यापूर्वी त्याच स्वरूपाच्या साल्वो या क्षेपणास्त्राच्या चाचण्याही यशस्वी झाल्या आहेत. नस्र हे अधिक क्षमतेचे क्षेपणास्त्र असून त्याची युद्धक्षमता व प्रतिसाद क्षमता खूप जास्त आहे, असे या प्रक्षेपणानंतर काढण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. लष्करप्रमुख जनरल अशफाक परवेझ कयानी व इतर वरिष्ठ अधिकारी या क्षेपणास्त्राच्या चाचणी वेळी उपस्थित होते. जनरल कयानी यांनी सांगितले, की या हत्फ-९ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे पाकिस्तानची संरक्षण सिद्धता वाढली आहे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 4:35 am

Web Title: pakistan tests fire hatf 9 nasr missile successfully
Next Stories
1 ‘ड्रीमलायनर’च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह
2 सौदीतून १.३४ लाख कामगार मायदेशी
3 पोस्टर्सवरून भाजप नेते हद्दपार
Just Now!
X