25 September 2020

News Flash

अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पाकिस्तान आता गाढवांची मदत घेणार

गाढवांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये पाकिस्तान तिसऱ्या स्थानी

गाढवांची मदत घेणार

भारताचा शेजारी असणाऱ्या पाकिस्तानमधील परदेशी चलन अगदी संपुष्टात येण्याचे चित्र सध्या दिसत आहे. परदेशातून घेतलेल्या कर्जाचा डोंगर आणि दुसरीकडे परदेशी चलनाचा तुटवडा अशा दुहेरी आर्थिक कात्रीमध्ये पाकिस्तान सापडला आहे. या संकटातून बाहेर येण्यासाठी आणि अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पाकिस्तान चक्क गाढवांची मदत घेणार आहे. गाढवांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी असणारा पाकिस्तान आता परदेशी चलन मिळवण्यासाठी गाढवांची निर्यात करणार आहे. त्यातही पाकिस्तान खास करुन चीनला गाढवे विकण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

चीनमध्ये गाढवांना खूप मागणी आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे चीनमध्ये पारंपारिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या औषधांमध्ये गाढवांच्या अवयवांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. गाढवाच्या कातडीपासून बनवण्यात येणाऱ्या जीलेटीनचा वापर चीनमध्ये औषध म्हणून केला जातो. जीलेटीन वापरुन बनवण्यात येणाऱ्या औषधांचा वापर रक्त शुद्धीसाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केला जातो.

गाढवांची सर्वाधिक संख्या असलेल्या देशांच्या यादीमध्ये पाच कोटी गाढवांसहीत पाकिस्तान तिसऱ्या स्थानी आहे तर चीन पहिल्या क्रमांकावर आहे. तरी गाढवांचा चीनमध्ये होणारा वापर हा पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच पाकिस्तान आता गाढवे चीनला निर्यात करणार आहे.

पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पशु अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चीनमधील कंपन्यांना पाकिस्तानमधील गाढवांच्या व्यापारामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा आहे. जीओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार यासाठी चीनी कंपन्या ३०० कोटी गुंतवण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. देशाला परदेशी चलन मिळवून देण्यासाठी पाकिस्तानमधील पशु विभागाने वेगळ्या प्रजातीच्या गाढवांची पैदास करण्याची तयारी दर्शवली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार डेला इस्माइल खान आणि मानसेरा येथे निर्यात करता येणाऱ्या गाढवांची पैदास करण्यासाठी केंद्र स्थापन केली आहेत. परदेशी कंपन्यांच्या मदतीने ही केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. पहिल्या तीन वर्षांमध्ये पाकिस्तानने ८० हजारहून अधिक गाढवं चीनमध्ये निर्यात करण्याचे उदिष्ट ठेवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 3:59 pm

Web Title: pakistan to earn millions by exporting donkeys to china
Next Stories
1 ‘कधीही लाच घेऊ नकोस’,….जेव्हा मोदींच्या आईने मागितलं होतं आश्वासन
2 कनिष्ठ जातीतील मुलासोबत प्रेमसंबंध, वडिलांनी गळा दाबून केली मुलीची हत्या
3 एअर इंडियाच्या जेवणात सापडलं झुरळ
Just Now!
X