News Flash

पाकिस्तान काश्मिरात हिंसाचार भडकावण्याच्या तयारीत -लष्करप्रमुख

काश्मिरमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानकडून सोशल मिडीयातून माहिती युद्धच छेडण्यात आले आहे.

जम्मू काश्मीरच्या मुद्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जावी म्हणून पाकिस्तान काश्मीर खोऱ्यात हिंसाचार भडकावण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली. त्यासाठी पाकिस्तानने खोटी माहिती पसरवण्याची मोहिमच हाती घेतली असल्याचे रावत म्हणाले.

जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० आणि ३५ए मोदी सरकारने ५ ऑगस्ट रोजी रद्द केले. त्याचबरोबर जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन करण्याचा निर्णयही घेतला आहे. भारताने घेतलेल्या या निर्णयामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. या निर्णयाविरोधात पाकिस्तानने अनेक मार्गांनी रोष व्यक्त करीत युनोच्या सुरक्षा परिषदेपर्यंत धाव घेतली होती. दरम्यान, काश्मीर प्रश्नांकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी पाकिस्तानने आता हिंसाचाराला चिथावणी देणारी मोहीम हाती घेतली असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.

लष्करप्रमुख बिपीन रावत म्हणाले, काश्मीर खोऱ्यात हिंसेला चिथावणी देणारी आणि खोटी माहिती पसरवण्याचा कट पाकिस्तानने रचला आहे. खोट्या माहितीमुळे काश्मीरात हिंसाचार उफाळून आल्यास त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न पाकिस्तानचा आहे. विशेष दर्जा काढण्याच्या निर्णयाला काश्मीरी जनतेचा विरोध आहे. त्यामुळेच हा हिंसाचार निर्माण झाला आहे, असे चित्र पाकिस्तानकडून दाखवले जाणार असल्याची शक्यता लष्करप्रमुखांनी व्यक्त केली.

५ ऑगस्टनंतर काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानकडून सोशल मिडीयातून ‘माहिती युद्धच’ छेडण्यात आले आहे. काश्मीरात मानवी अधिकारांचे भारताच्या उपलष्करप्रमुखांकडून उल्लंघन केले जात असल्याचे एका ट्विटर हँडलवरून देण्यात आली होती. त्यानंतर पंधरादिवसांपूर्वी अशीच खोटी माहिती सोशल मिडीयावरून पसरवण्यात आली. असे दहा ट्विटर हँडल सरकारच्या सायबर विंगने शोधून काढले आहेत. काश्मीरात निष्पापांचे बळी जाणार नाही, यालाच लष्कराचे प्राधान्य आहे. त्यादृष्टीने परिस्थिती हाताळण्यात येणार असल्याचे रावत यांनी सांगितले.

भारतीय लष्कराच्या माहितीप्रमाणे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराने दक्षता म्हणून वादग्रस्त सीमेवर अधिकचे सैन्य तैनात केले आहे. भारतीय लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि निमलष्करी दलाने घुसखोरीविरोधात धडक कारवाई केल्याने दहशतवादी कारवायाही बोथट झाल्या आहेत. मात्र, पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत, असेही लष्कराने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 2:20 pm

Web Title: pakistan to instigate violence in the jammu and kashmir jk to internationalize the jammu and kashmir issue bmh 90
Next Stories
1 पाकिस्तानचा धोका! इस्रायलकडून दोन अवॉक्स, एअर टू एअर मिसाइल्स खरेदीचा भारताचा प्लान
2 ATMमधून आता वारंवार पैसे काढण्यावर येणार निर्बंध?; ‘या’ नियमात बदलाची शक्यता
3 “पूरग्रस्तांसाठी हे ही घ्या”, आठ वर्षांच्या चिमुरडीने मुख्यमंत्र्यांना काढून दिले कानातील सोन्याचे डूल
Just Now!
X