28 February 2021

News Flash

पाकिस्तानकडून पुंछ भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारताकडून जोरदार प्रत्युत्तर

दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गोळीबार

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमेवरील पुंछ आणि नौशेरा भागात शुक्रवारी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. याला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तरही देण्यात आले आहे.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पुंछ जिल्ह्यातील शाहपूर भागात दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. मॉर्टर्स, स्वयंचलित आणि लहान बंदुकांच्या सहाय्याने त्यांनी भारतीय चौक्यांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, पाकिस्तानच्या या कृत्याला भारतीय जवानांनी गोळीबाराद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच राजौरी जिल्ह्यातील बाबा खोरी आणि नौशेरा भागातील कळशिअन भागात पाकिस्तानी सैन्याकडून सकाळपासून गोळीबार सुरु होता. मात्र, या गोळीबारात भारताचे कुठलेही नुकसान झालेले नसल्याचे लष्करी सुत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान, सीमा सुरक्षा दलाकडून बुधवारी आणि गुरुवारी रात्री पाकिस्तानी रेंजर्सच्या अनेकांना टिपले होते. तसेच सिअरकोट येथील त्यांच्या तीन मॉर्टर चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. यानंतर आंतरराष्ट्रीय सीमेवरील सांबा भागात पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारात भारताचे एक हेड कॉन्स्टेबल शहीद झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 5:24 pm

Web Title: pakistan troops violate ceasefire in poonch nowshera sector indian troops retaliating
Next Stories
1 चारा घोटाळा: लालूंच्या शिक्षेच्या निकालाला तारीख पे तारीख
2 मंत्रालयातील शिपायाच्या जागेसाठी आमदाराच्या मुलाचा अर्ज
3 केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार; पहिल्यांदाच दोन टप्प्यात अधिवेशन
Just Now!
X