08 August 2020

News Flash

कलिंगड चोरले म्हणून दोन मुलांना विवस्त्र फिरवले

मुलांचा व्हिडिओ बनवून अपशब्ददेखील वापरले.

पाकिस्तानमध्ये घडलेल्या एका घटनेत कलिंगडाची चोरी करताना पकडलेल्या दोन मुलांना विवस्त्र करून रस्त्यावरून फिरवण्याच्या प्रकरणी पाकिस्तानी पोलिसांनी दोन जणांना अटक केली. याबद्दल वरिष्ठ पोलिस अधिकारी फिरोज म्हणाले, बशारत आणि इरफानने त्यांच्या दुकानातून नऊ आणि १३ वर्षांच्या दोन मुलांना कलिंगडाची चोरी करताना पकडले. दोघांनी मुलांना यातनाच दिल्या नाहीत तर त्यांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली. मुलांचा व्हिडिओ बनवून अपशब्ददेखील वापरले. त्यातील एका मुलाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बशारत, इरफान आणि त्यांच्या अन्य साथीदारांना अटक केल्याचे फिरोज यांनी सांगितले. ज्या मोबाईल फोनचा वापर मुलांचा व्हिडिओ तयार करण्यासाठी करण्यात आला होता ते मोबाइल फोन पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती फिरोज यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2016 5:58 pm

Web Title: pakistan two child naked for theft watermelon in lahore
टॅग Children,Pakistan
Next Stories
1 घरात पडल्याने दृष्टिहिन वृद्धेची दृष्टी परतली
2 कागदपत्रे प्रमाणित केल्याचा सुब्रमण्यम स्वामींचा दावा उपसभापतींनी फेटाळला
3 उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि भाजपची पोस्टरबाजी
Just Now!
X