News Flash

ट्रम्प इफेक्ट, अमेरिका- पाकमधील तणाव शिगेला

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिका दौरा रद्द केला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (संग्रहित छायाचित्र)

अमेरिका आणि पाकिस्तानमधील तणाव आता शिगेला पोहोचला असून पाकिस्तानने अमेरिकेशी द्विपक्षीय चर्चा आणि अमेरिकेतील नियोजित दौरे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिका दौरा रद्द केला आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या ‘दहशतवादी संघटनां’ना आश्रय देण्याच्या भूमिकेवर सडकून टीका केली होती. पाकिस्तान तालिबानी आणि अन्य दहशतवादी संघटनांना देत असलेल्या आश्रयाबाबत आता आम्ही गप्प बसू शकत नाही. हे असेच चालू राहिले तर अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील सहकार्याचे संबंधही सुरू राहणार नाहीत, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर आता पाकिस्ताननेही अमेरिकेविरोधात भूमिका घेतली आहे.

अमेरिकेच्या प्रभारी सहायक दक्षिण व मध्य आशिया कामकाज मंत्री व अफगाणिस्तान-पाकिस्तानसाठीचे प्रभारी विशेष प्रतिनिधी अलाइस वेल्स यांचा दौरा ठरला होता. मात्र ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर पाकने या अधिकाऱ्यांच्या दौऱ्यास विरोध दर्शवला. अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची भेट पाकिस्तानने लांबणीवर टाकली होती. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी सोमवारी खासदारांना माहिती देताना अमेरिकेशी द्विपक्षीय चर्चा थांबवण्यात आल्याचे सांगितले. तसेच अमेरिकेतील पूर्व नियोजित दौरेही रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ख्वाजा असीफ हे चीन, रशिया व तुर्की दौऱ्यावर जाऊन त्या देशांचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 6:24 pm

Web Title: pakistan us ties scraps bilateral visits after us president donald trump called pakistan terrorist state
Next Stories
1 जामा मशीद स्फोटप्रकरणी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी यासीन भटकळवर आरोप निश्चिती
2 डोकलाम प्रकरणावरून धडा घ्या, चीनने भारताला सुनावले
3 तुम्ही ‘पॅन’ आणि ‘आधार’ कार्ड लिंक केलंय का? यासाठी राहिलेत केवळ तीन दिवस
Just Now!
X