06 July 2020

News Flash

नऊ दिवसांमध्ये तिस-यांदा पाकिस्तानी सैन्याकडून सीमारेषेवर गोळीबार

पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करत, पूँछमधील नियंत्रण रेषेजवळ भारतीय चौक्यांच्या दिशेने शनिवारी जोरदार गोळीबार केला.

| May 4, 2014 03:50 am

पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करत, पूँछमधील नियंत्रण रेषेजवळ भारतीय चौक्यांच्या दिशेने शनिवारी जोरदार गोळीबार केला.
भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याच्या या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.  पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराचा फायदा घेऊन काही दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अधिका-यांनी दिली. पाकिस्तानच्या सैन्याच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना दहशतवाद्यांकडूनही गोळीबार करण्यात आला. मात्र भारताने केलेल्या कारवाईपुढे घुसखोरांचे लक्ष्य विफल ठरले. याआधीही २५ एप्रिल रोजी पाकिस्तानकडून भारतीय चौक्यावर गोळीबार करण्यात आला होता. नऊ दिवसातील हा तिसरा गोळीबार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2014 3:50 am

Web Title: pakistan violates ceasefire again third incident in nine days
टॅग Pakistan,Poonch
Next Stories
1 आसामातील दहशतीने हजारोंचे स्थलांतर
2 आसामातील हिंसाचाराला राजकीय रंग
3 बळींची संख्या ५०० च्या वर
Just Now!
X