10 August 2020

News Flash

भारताला स्थायी सदस्यत्व देण्यास पाकिस्तानचा संयुक्त राष्ट्रसंघात विरोध

मलिहा लोधी यांनी म्हटले आहे, की जी ४ सदस्यांनी स्थायी सदस्यत्वावर केलेला दावा योग्य नाही.

| May 11, 2016 02:14 am

भारत व त्याच्या जी ४ मित्र देशांना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचे स्थायी सदस्यत्व देण्यास पाकिस्तानने विरोध केला आहे. या देशांनी केवळ स्वहिताच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांचा आधार घेत ही मागणी केली असून ती तर्कसंगत नाही, असे पाकिस्तानने म्हटले आहे.

पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रातील दूत मलिहा लोधी यांनी आमसभेच्या अनौपचारिक बैठकीत आंतरसरकारी वाटाघाटींच्या वेळी सांगितले, की सुरक्षा मंडळाचा विस्तार हा केवळ काही देशांच्या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्यासाठी नसावा. जी ४ देशात ब्राझील, जर्मनी, भारत व जपान यांचा समावेश होतो.

मलिहा लोधी यांनी म्हटले आहे, की जी ४ सदस्यांनी स्थायी सदस्यत्वावर केलेला दावा योग्य नाही. भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरउद्दीन यांनी सांगितले, की सुरक्षा मंडळात सध्या असलेला असमतोल दूर करण्याची गरज आहे.

मलिहा लोधी यांनी सांगितले, की भारत व मित्र देशांनी केलेला दावा हा तर्कसंगत नसून केवळ स्थायी सदस्यांची संख्या वाढवल्याने त्या देशांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शिवाय सदस्य देशांनी मान्य केलेल्या लोकशाही तत्त्वांच्या हे विरोधात आहे. निवडणुकीच्या आधारावर अतिरिक्त कालबद्ध पदे वाढवणे व फिरते सदस्यत्व ठेवणे यामुळे सर्वाना समान संधी मिळेल, असा दावा त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2016 2:14 am

Web Title: pakistan will not accept india as unsc permanent member
टॅग Pakistan
Next Stories
1 भारतात हल्ले करणाऱ्या जिहादींवर पाकिस्तानने खटले भरावेत- हक्कानी
2 ‘डे-केअर’मधील तीन वर्षांच्या चिमुकलीचा अंगठा तुटला, व्यथित आईची फेसबुक पोस्ट
3 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; योगेश कुंबेजकर महाराष्ट्रातून पहिला
Just Now!
X