News Flash

परदेशी गुप्तचर यंत्रणेचा हाफिज सईदला ठार मारण्याचा कट; पाकिस्तानला संशय

हाफिज सईदच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद. (संग्रहित छायाचित्र)

मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार आहे. हाफिजची सुरक्षा वाढवण्यासाठी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी विभागातील अधिकाऱ्यांनी पंजाब प्रांताच्या गृह विभागाला पत्र लिहिले आहे. परदेशी गुप्तचर यंत्रणेकडून हाफिजच्या हत्येचा कट आखण्यात आल्याचा संशय पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी विभागातील अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळेच हाफिजची सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

लष्कर-ए-तोयबा, जमात-उद-दावा यांच्यासारख्या दहशतवादी संघटनांचा म्होरक्या असलेला हाफिज सईद सध्या लाहोरमधील जोहर टाऊनमध्ये वास्तव्यास आहे. हाफिज सईदच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी विभागाने पंजाब प्रांताच्या गृह विभागाला पत्र लिहिले आहे. ‘एका परदेशी गुप्तचर यंत्रणेने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या दोन सदस्यांना हाफिजची हत्या करण्यासाठी आठ कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे हाफिज सईदच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी,’ असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दहशतवादविरोधी कायदा १९९७ च्या अंतर्गत हाफिज सईदला ३० जानेवारीपासून लाहोरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. गृह विभागाने त्याच्या नजरकैदेत ३० दिवसांची (२६ नोव्हेंबरपर्यंत) वाढ केली आहे. हाफिज सईदला नजरकैदेतून मुक्त केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच त्याची नजरकैद वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हाफिज सईद नजरकैदेत असला, तरी त्याच्या चार साथीदारांची सुटका करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील पंजाब सरकारने हा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेने जून २०१४ मध्ये जमात-उद-दावाला परदेशी दहशतवादी संघटना घोषित केले आहे. हाफिज सईदचा अनेक दहशतवादी कारवायांशी संबंध आढळल्याने अमेरिकेने त्याच्यावर एक कोटी डॉलरचे बक्षीसदेखील जाहीर केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 1:03 pm

Web Title: pakistani authorities wants more security for hafiz saeed
Next Stories
1 आम्ही मोदींसारखा पंतप्रधानपदाचा अपमान करत नाही- राहुल गांधी
2 आरक्षण नंतर, पहिल्यांदा भाजपला पराभूत करायचंय: हार्दिक पटेल
3 भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे बांगलादेशाचे पहिले हिंदू सरन्यायाधीश सिन्हांचा राजीनामा
Just Now!
X