सादिक खान यांची शनिवारी लंडनच्या महापौरपदी नेमणूक झाल्याची घोषणा करण्यात आली. यानिमित्ताने लंडन शहराचा महापौर होण्याचा मान प्रथमच एखाद्या मुस्लिम नागरिकाला मिळाला आहे. लेबर पार्टीचे सादिक खान यांची लंडनच्या महापौरपदी निवड झाली आहे. सादिक खान हे पाकिस्तानी वंशाचे आहेत.सादिक खान यांचे वडील लंडनमध्ये बस चालक होते. त्यांनी महापौरपदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत कंझरव्हेटिव पक्षाचे उमेदवार जॅक गोल्डस्मिथ यांचा पराभव केला. गोल्डस्मिथ यांनी निवडणूक प्रचारात हिंदू आणि शीख मतदारांना आकर्षित करण्यासाठी नरेंद्र मोदींच्या नावाचा उपयोग केला होता. पण, त्यांना याचा विशेष फायदा झाला नाही.