लॉर्ड्सच्या मैदानावर रविवारी पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिका या दोन संघांमध्ये विश्वचषक स्पर्धेतला सामना रंगला होता. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने सर्वात आधी फलंदाजी स्वीकारली आणि दक्षिण अफ्रिकेपुढे विजयासाठी ३०९ धावांचं आव्हान ठेवलं. हे लक्ष्य गाठताना दक्षिण अफ्रिकेची दाणादाण उडाली. २५९ धावांपर्यंतच त्यांना मजल मारता आली, त्यामुळे हा सामना पाकिस्तानने जिंकला. मात्र मैदानाबाहेर वेगळाच राडा पाहण्यास मिळाला. काही बलुच कार्यकर्त्यांनी लावलेले पोस्टर्स पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी फाडले. त्यामुळे इकडे मैदानावर सामना रंगलेला असताना मैदानाबाहेर वेगळाच राडा पाहण्यास मिळाला.

HELP #END, DISAPPEARANCES PAKISTAN असे संदेश लिहिलेली पोस्टर बलुच कार्यकर्त्यांनी लॉर्ड्सच्या मैदानाबाहेर लावली होती. ही पोस्टर्स पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी फाडून टाकली. ही पोस्टर्स फक्त फाडलीच नाहीत तर ती पायाखाली तुडवलीसुद्धा! एएनआयने या संदर्भातले वृत्त देऊन एक व्हिडिओच पोस्ट केला आहे. बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा लढा सुरू आहे. अशात विश्वचषक क्रिकेट सामना असताना बलुच कार्यकर्त्यांनी लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानाबाहेर काही पोस्टर्स लावली होती. जी पोस्टर्स पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी फाडली.