News Flash

२६/११ सारखा हल्ल्याचा कट रचणारा पाकिस्तानी डिप्लोमॅट NIA च्या वाँटेड लिस्टमध्ये

भारतात दहशतवादाशी संबंधित विविध गुन्ह्याचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) पहिल्यांदाच वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्याचा समावेश केला आहे.

भारतात दहशतवादाशी संबंधित विविध गुन्ह्याचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) पहिल्यांदाच वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्याचा समावेश केला आहे. एनआयएने या अधिकाऱ्याचा फोटो सुद्धा प्रसिद्ध केला आहे. एनआयएने आमिर झुबेर सिद्दिकीचा अन्य दोन पाकिस्तानी अधिकाऱ्यांसह वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत समावेश केला आहे.

आमिर झुबेर सिद्दिकी श्रीलंकेत कोलंबोमध्ये पाकिस्तानी उच्चायोगात व्हिसा सल्लागार म्हणून काम करतो. २०१४ मध्ये दक्षिण भारतातील लष्कर आणि नौदलाचे तळ तसेच अमेरिका आणि इस्त्रायलच्या दूतावासावर २६/११ सारखा हल्ल्याचा कट रचण्यात आला होता.

या कटामध्ये आमिर झुबेरसह अन्य दोन अधिकारी सहभागी असल्याचा आरोप आहे. कोलंबोमधील पाकिस्तानी उच्चायोगात काम करणारा चौथा पाकिस्तानी अधिकारीही या कटात सहभागी होता असे एनआयएने म्हटले. ज्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांवर आरोप आहे ते मायदेशी परतले आहेत. आरोपींविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी एनआयए इंटरपोलला विनंती करणार आहे.

सिद्दिकीसह ज्या अन्य दोन अधिकाऱ्यांचा वाँटेड लिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्या दोघांची अद्याप ओळख पटलेली नाही. ते दोघे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे अधिकारी आहेत. भारताने पहिल्यांदाच पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचा वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत समावेश केला आहे.

कोलंबोमध्ये २००९ ते २०१६ दरम्यान काम करताना या पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी एजंटसच्या मदतीने चेन्नई आणि दक्षिण भारतातील महत्वाच्या ठिकाणांवर हल्ल्याचा कट रचला होता अशी माहिती एनआयएने दिली आहे. सिद्दिकीने श्रीलंकन नागरीक मोहम्मद साकीर हुसैनवर या हल्ल्याची जबाबदारी सोपवली होती. अरुण सेल्वाराज, सिवाबालन आणि थामीम अन्सारी या तिघांची सुद्धा निवड केली होती. या चौघांनाही अटक करण्यात आली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2018 11:12 am

Web Title: pakistani diplomat in nia wanted list
Next Stories
1 इंग्लंडची राणी प्रेषित मोहम्मद यांची थेट वंशज; मोरोक्कोतील इतिहासतज्ज्ञाचा खळबळजनक दावा
2 घरात घुसून टीव्ही पत्रकारावर झाडली गोळी , हल्लेखोर फरार
3 देशात केवळ 6 विमानतळांवरच बॉम्ब निष्क्रीय करणं शक्य !
Just Now!
X