02 March 2021

News Flash

Surgical Strike 2: भारताची विमानं पाहून पाकिस्तान घाबरलं, उत्तर देण्यासाठी आलेली विमानं मागे पळाली

भारताने हल्ला केल्याची माहिती मिळताच पाकिस्तानची एफ16 विमानं प्रत्युत्तर देण्यासाठी हवेत झेपावली होती

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर मोठी कारवाई केली. भारताने हल्ला केल्याची माहिती मिळताच पाकिस्तानची एफ16 विमानं प्रत्युत्तर देण्यासाठी हवेत झेपावली होती. पण भारतीय विमानं पाहून त्यांनी आपली विमानं मागे फिरवली. भारताकडे असणारा स्फोटकांचा साठा, विमानांचा ताफा तसंच मिराज २००० समोर आपला टिकाव लागणार नाही हे लक्षात आल्यानंच पाकिस्तान लष्कराने विमानांना पुन्हा माघारी बोलावालं. वेस्टर्न एअर कमांड या सर्व ऑपरेशनचं नेतृत्व करत होते. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. पाकिस्तान हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही सांगितले जाते. तत्पूर्वी, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय वायूसेनेच्या विमानांनी एलओसीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. या हल्ल्यात किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानी लष्कराने भारतीय विमाने पीओके घुसल्याचे मान्य केले आहे. मात्र, त्यांनी मोठ्या नुकसानीचे वृत्त फेटाळले आहे.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार सुमारे १२ मिराज २००० लढाऊ विमानांनी सीमा पार करून दहशतवादी तळांवर हल्ला केला. यात दहशतवादी तळ पूर्णपणे उद्धवस्त झाले आहेत. बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोटी येथील जैश ए मोहम्मदचे तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत. उरी हल्ल्यानंतरही भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 12:04 pm

Web Title: pakistani f16s turned back due to size of indian formation
Next Stories
1 …म्हणून एअर स्ट्राइकसाठी बालाकोटची निवड: परराष्ट्र मंत्रालय
2 भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर भारतीय लष्कराने ट्विट केली ‘ही’ कविता
3 Surgical Strike 2: ‘पुरावे मागणाऱ्यांच्या हातात द्या १०० ग्रॅम बॉम्ब’
Just Now!
X