02 March 2021

News Flash

पाकिस्तानात पोलिसानेच हिंदू मुलीचं अपहरण केलं आणि….

ती शाळेतून घरी परतलीच नाही.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका पोलिसाने अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण करुन तिच्यासोबत निकाह केला. निकाह करण्याआधी त्याने हिंदू मुलीला जबरदस्ती इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडला. गुलाम मारुफ कादरी या पोलिसाने सिंधच्या नौशाहरो फिरोझ जिल्ह्यातून अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण केले. परिसरातील अल्पसंख्यांकाच्या सुरक्षेसाठी गुलाम मारुफ कादरीला तिथे तैनात करण्यात आले होते.

“पाच दिवसांपूर्वी मुलगी बेपत्ता झाली. ती शाळेतून घरीच परतलीच नाही. कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केल्यानंतर तिचे अपहरण झाल्याचे समजले.” सिंधमधील एका हिंदू नेत्याने टाइम्स ऑफ इंडियाला ही माहिती दिली. गुलाम मारुफ कादरीने ११ फेब्रुवारीला स्थानिक दर्ग्यामध्ये मुलीला इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडला. तिला मरीया हे नाव दिले. त्यानंतर घरापासून ४०० किमी अंतरावर कराचीमध्ये त्याने निकाह केला, अशी माहिती अखिल पाकिस्तान हिंदू पंचायतीने दिली.

कादरीने मंगळवारी निकाह झाल्याचे सार्वजनिक केले. सोशल मीडियावर अपलोड केलेल्या लग्नाच्या सर्टिफिकेटमध्ये कादरीची जन्मतारीख नमूद केली आहे तसेच मुलीचे वय १९ दाखवले आहे. मुलीच्या कुटुंबाने ती अल्पवयीन असल्याचा दावा केला आहे. “या घटनेनंतर आमच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही” असे सिंध प्रांतातील हिंदू नेत्याने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 3:21 pm

Web Title: pakistani hindu girl abducted by cop forced to convert dmp 82
Next Stories
1 “मुस्लिमांना भारताहून चांगला देश, हिंदूहून चांगला मित्र आणि मोदींहून चांगला नेता मिळणार नाही”
2 आशियामधील सर्वात महागडा फ्लॅट; किंमत पाहून डोळे फिरतील
3 पंजाबमध्ये भाजपाला धक्का; काँग्रेसचा मोठा विजय
Just Now!
X