24 September 2020

News Flash

‘बीएसएफ’कडून पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा

राजस्थान सीमेवर मध्यरात्री सुरू असलेला घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील बाखसर ठाणा क्षेत्रातील बीकेडी जवळ रात्री उशीरा पाकिस्तानकडून करण्यात आलेला घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफच्या जवानांनी हाणून पाडला. काल रात्री साधारण एक वाजेच्या सुमारास पाकिस्तानच्या हद्दीतून भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा एक घुसखोर प्रयत्न करत होता. मात्र, या ठिकाणी तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी त्याचा खात्मा केला.

हा घुसखोर जेव्हा सीमारेषेवरील ताराबंदीजवळ पोहचला तेव्हा, सर्वप्रथम त्याला बीएसएफच्या जवानांकडून चेतावनी देण्यात आली होती. मात्र तरी देखील तो माघारी फिरण्यास तयार नव्हता, जवानांकडून दिल्या जात असलेल्या इशाऱ्याकडे त्याने दुर्लक्ष करणे सुरू ठेवले. यानंतर जेव्हा तो सीमारेषेवरील तारांचे कुंपण ओलांडून आत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा जवानांनी त्याला शेवटचा इशारा देत त्याच्या दिशेने गोळीबार केला, ज्यामध्ये तो ठार झाला. प्राप्त माहितीनुसार जवानांकडून चार राउंड फायर करण्यात आले होते.

बीएसएफच्या जवानांनी घुसखोराचा खात्मा केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर, घटनास्थळी लष्करी अधिकरी देखील पोहचले. शिवाय, स्थानिक पोलिसांना देखील याबाबत माहिती देण्यात आली. या घुसखोराचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नानंतर सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे. शिवाय, हा घुसखोर नेमका कोणत्या उद्देशाने घुसखोरी करत होता याचा देखील शोध लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 2:06 pm

Web Title: pakistani intruder shot dead by bsf on international border msr 87
Next Stories
1 चीनसोबत एखादा पक्ष कसा करार करू शकतो?; न्यायालयाचा काँग्रेसला सवाल
2 केरळ विमान अपघात : मृतांपैकी दोन प्रवासी निघाले करोना पॉझिटिव्ह
3 सुशांत सिंह मृत्यू प्रकरण : ‘पाळीव कुत्र्याच्या बेल्टने आवळला सुशांतचा गळा’
Just Now!
X