मायदेशी परतल्यापासून पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेज मुशर्रफ यांच्या अडचणीत सातत्याने भरच पडत आह़े  बेनझीर भुट्टो यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्यावर खटला सुरू असतानाच आता पाकिस्तानी पोलिसांनी त्यांच्यावर आणखी एक हत्येचा गुन्हा दाखल केला आह़े  २००७ साली लाल मशिदीवरील कारवाईदरम्यान पाकिस्तानातील पुरोगामी धार्मिक नेते अब्दुल रशीद गाझी आणि त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता़  त्याबद्दल त्यांना जबाबदार धरण्यात आले आह़े
इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे न्या़  नुरूल हक कुरेशी यांच्या आदेशान्वये ही कार्यवाही करण्यात आली आह़े  कुरेशी यांनी यापूर्वी या संदर्भात दिलेल्या आदेशांचे पालन न झाल्यामुळे संतापून त्यांनी पुन्हा आदेश दिल़े  गाझी यांच्या मुलाने केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हे आदेश देण्यात आल़े  तसेच आदेशांचे पालन न करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान असल्याचेही न्या़ कुरेशी यांनी पोलिसांना सुनावल़े