X

पाकिस्तानी कैद्याची जयपूर कारागृहात हत्या

दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती असताना राजस्थानमधून मोठी बातमी

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती असताना राजस्थानमधून एक मोठी बातमी आली आहे. बुधवारी राजस्थानच्या जयपूर तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या एका पाकिस्तानी कैद्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

जयपूर मध्यवर्ती कारागृहात असलेला पाकिस्तानी कैदी शकिर उल्लाह याला कारागृहातील इतर कैद्यांनी बेदम मारहाण केली, या मारहाणीत शकिर उल्लाह याचा जागेवरच मृत्यू झाला. पाकिस्तानचा गुप्तहेर असल्याचा शकीरूल्लाह याच्यावर आरोप होता.

पाकिस्तानी कैदी शाकिर उल्ला बॅरेकमध्ये इतर कैद्यांसह टीव्ही पाहात होता. टीव्हीचा आवाज कमी-जास्त करण्यावरून कैद्यांमध्ये वाद झाला होता. यानंतर शाकीर याला झालेल्या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त लक्ष्मण गौड यांनी सांगितले.

50 वर्षांच्या उल्लाह याला 2011 मध्ये युपीए (अनलॉफुल अॅक्टिव्हिटी) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती.