News Flash

पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताचे प्रत्युत्तर, ७ पाक रेंजर्स ठार

घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्याचा सीमा सुरक्षा दलाकडून खात्मा

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सात पाकिस्तानी रेंजर्सना कंठस्नान घातले आहे. पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यावर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. याशिवाय एका दहशतवाद्याचा सीमा ओलांडून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्नदेखील भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे.

शुक्रवारी सकाळी ९.३५ च्या सुमारास पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार सुरू केला. जवळपास ४० मिनिटे पाकिस्तानकडून गोळीबार सुरू होता. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला. यानंतर पुन्हा दुपारी १२.१५ च्या सुमारास पाकिस्तानने गोळीबार सुरू केला. कथुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमधील बोबीयान भागात पाकिस्तानने जोरदार गोळीबार केला. यानंतर भारताने पाकिस्तानी सैन्याला जशास तसे उत्तर दिले. यामध्ये ७ पाकिस्तानी रेंजर्स ठार झाले.

उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्टाइक केले. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याने दहशतवाद्यांचे आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळेच पाकिस्तान सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाते आहे. तोफगोळे आणि छोट्या शस्त्रांचा आधार घेत पाकिस्तानकडून वारंवार हल्ले केले जात आहेत. राजौरी जिल्ह्यात बुधवारी रात्रभर पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचा मारा सुरू होता.

पाकिस्तानकडून वारंवार करण्यात येणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शुक्रवारी भारतीय सैन्याने सात पाकिस्तानी रेंजर्सला टिपले असले तरी सुदैवाने भारताची कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 8:31 pm

Web Title: pakistani rangers 7 killed international border kathua bsf
Next Stories
1 …तर अफ्स्पा कायदा मागे घेतला जाईल- मेहबूबा मुफ्ती
2 पाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ
3 २०० कोटी जमा केल्याने सुब्रतो रॉय यांना दिलासा, २८ नोव्हेंबरपर्यंत पॅरोल मंजूर
Just Now!
X