08 March 2021

News Flash

पाकिस्तानी पत्रकार चाँद नवाब यांना पोलिसांकडून मारहाण

'बजरंगी भाईजान' या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले पाकिस्तानी पत्रकार चाँद नवाब यांना मंगळवारी कराची पोलिसांनी माराहाण केल्याची घटना घडली

अभिनेता सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले पाकिस्तानी पत्रकार चाँद नवाब यांना मंगळवारी कराची पोलिसांनी माराहाण केल्याची घटना घडली. सूत्रांच्या माहितीनूसार चाँद नवाब हे पाकिस्तानमधील कँट रेल्वेस्थानकात सुरू असणाऱ्या तिकीटविक्रीच्या गैरव्यवहाराचे वृत्तांकन करत होते. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी चाँद नवाब यांना मारहाण केली.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. खुद्द अभिनेता सलमान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि कबीर खान यांनी फोनवरून चाँद नवाब यांच्या तब्येतीची चौकशी केल्याचे सांगण्यात येत आहे. तब्बल ९२ वृत्तवाहिन्यांमध्ये काम केलेले चाँद नवाब हे मध्यंतरी  ईदनिमित्त केलेल्या वृत्तांकनाच्या एका व्हिडिओमुळे सोशल मिडीयावर प्रचंड चर्चेत आले होते. त्यानंतर चाँद नवाबच्या प्रत्यक्ष आयुष्यापासून ‘प्रेरणा’ घेऊन अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी याने ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटामध्ये भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2015 5:34 pm

Web Title: pakistani reporter chand nawab beaten up by karachi police
टॅग : Bajrangi Bhaijaan
Next Stories
1 सत्तेत असताना जमिनी बळकावलेल्यांनी शेतकऱयांच्या हिताबद्दल बोलू नये- व्यंकय्या नायडू
2 वादग्रस्त विधानामुळे निवडणूक आयोग भाजपला नोटीस बजावणार
3 गदारोळानंतर संपूर्ण विसंकेत धोरण आराखडाच मागे घेण्याचा निर्णय
Just Now!
X