भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी गेलेले पाकिस्तानचे खासदार अब्दुल रेहमान मलिक सोशल मीडियावर स्वत:च ट्रोल झाले आहेत. अब्दुल रेहमान मलिक यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारी महिला म्हणून चक्क पॉर्नस्टार मिया खलिफाचा फोटो शेअर केला आहे. अब्दुल रेहमान यांनी हे ट्विट केल्यानंतर काही वेळातच ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागलं.

काही वेळानं रेहमान यांना आपली चूक समजल्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलिट केलं. परंतु त्यांनी ट्विट डिलिट करेपर्यंत त्या ट्विटचे स्क्रिनशॉट व्हायरल झाले होते. ट्विट करून ते पुन्हा डिलिट केल्यानंतरही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं. स्थानिक भारतीय चित्रपटांमध्ये अभिनय करणाऱ्या अभिनेत्रींनी हिजाब परिधान करून सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या भारतील मुस्लिम नागरिकांसोबत एकी दाखवली, अशा आशयाचं ट्विट एका युझरनं केलं होतं. यासोबत त्या युझरनं हिजाब परिधान केलेल्या तीन महिलांचे फोटोदेखील लावले होते. यामध्ये पॉर्नस्टार मिया खलिफा आणि नादिया अली यांचेदेखील फोटो होते.

ऑफिशिअल ट्विट अकाऊंटवरून ट्विट केलं शेअर
हे ट्विट रेहमान यांनी आपल्या ऑफिशिअल ट्विटरवरूनदेखील शेअर केलं. तसंच त्यासोबतच गॉड ब्लेस हर असा मेसेजही लिहिला. रेहमान यांच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं. मनोरंजनामध्ये तुम्ही कोणतीही कसर सोडत नाही, पाकिस्तानच्या नागरिकांनी कोणाला निवडून दिलं आहे, अशा आशयाची ट्विट काही युझर्सनी केली. यापूर्वीही अब्दुल बासित यांनी पॉर्नस्टार जॉनी सिन्सचा फोटो शेअर करत काश्मीरमधील पॅलेट गनचे शिकार झाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं होतं. इतकचं नाही तर जॉनी सिन्सनंही त्यांना ट्रोल केलं होतं.