News Flash

पंजाबमध्ये पाकिस्तानी हेराला अटक; सिम कार्ड, कॅमेरा जप्त

पाकिस्तानचा मनसुबा भारतीय सुरक्षादलांनी उधळून लावला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

भारतीय वैमानिक अभिनंदन वर्थमान यांना सोडण्याचा निर्णय हा सद्भावनेतून घेतल्याचे पाकिस्तान सांगत असला तरी भारताविरोधात कट रचणे आणि नुकसान पोहोचवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. पाकिस्तानचा असाच एक मनसुबा भारतीय सुरक्षादलांनी उधळून लावला आहे. सुरक्षादलांनी शुक्रवारी पंजाबमधील फिरोजपूर येथून एका पाकिस्तानी हेराला अटक केली आहे. मोहम्मद शाहरुख असे या हेराचे नाव असून तो उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथील रहिवासी आहे. तो सोशल मीडियावर पाकस्थित ८ इस्लामिक समूहात सहभागी असल्याचे आढळून आले आहे.

शाहरुखकडून पाकिस्तानी सिम कार्ड आणि कॅमेरा जप्त करण्यात आले आहे. तो येथील बीएसएफ पोस्टची छायाचित्रे काढत होता.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुखकडे पाच ते सहा पाकिस्तानी मोबाइल क्रमांकही मिळाले आहेत. तो उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथील रहिवासी आहे. सुरक्षादलांनी त्याला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 11:13 am

Web Title: pakistani spy arrested in ferozepur punjab with pakistani sim card
Next Stories
1 २०१९ मध्ये बहुमताने जिंकू, नरेंद्र मोदीच होणार पंतप्रधान – अमित शहा
2 १४ फेब्रुवारीनंतर मला कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही, ट्रोल करणाऱ्यांना शहीदाच्या पत्नीचं उत्तर
3 भारत क्षेपणास्त्र डागण्याची पाकिस्तानला होती भीती?, अनेक देशांशी साधला होता संपर्क
Just Now!
X