फरिदकोट जिल्ह्य़ातील कोट कपुरा रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या लवदीप सिंग या इसमास पाकिस्तानसाठी हेरगिरी करीत असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून प्रतिबंधित परिसराची छायाचित्रे, लष्करी तळाची हस्तरेखांकित छायाचित्रे, लष्कराची माहितीपत्रके, आदी साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लवदीप सिंग हा फरिदकोटमधील लष्करी कॅण्टोनमेण्टमध्ये कारकून म्हणून काम करीत होता. प्राथमिक चौकशीअंती गेल्या दीड वर्षांपासून त्याने आयएसआयशी संधान बांधले असल्याचे आढळले असून फरिदकोट, फिरोझपूर, फाझिल्का विभागातील लष्कराच्या हालचालींची माहिती तो आयएसआयला पुरवीत होता. याखेरीज, सीमेवर भारतीय क्षेत्रात उभारले जात असलेल्या खंदकांसंबंधीही तो आयएसआयला माहिती देत असे. लष्करी वाहने, लष्करी कवायती, त्यांचे प्रशिक्षण या भागातील नवीन योजना, बांधकामे आदींसंबंधीही लवदीप सिंग आयएसआयला माहिती देत असल्याचे उघडकीस आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 27, 2014 6:11 am