पाकिस्तानी तालिबानने आपल्या प्रमुखपदी खान सय्यद मेहसूद उर्फ साजना याची निवड प्रमुखपदी केली आहे. तेहरीक ए तालिबान पाकिस्तानच्या मंडळाच्या (शुरा) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अतिरेकी गटांनी याला दुजोरा दिला नसला तरी ‘डॉन न्यूज’ ने हे वृत्त दिले आहे. पाकिस्तानातील तालिबानचा नवा नेता साजना अवघा ३६ वर्षांचा असून त्याने कराची येथील नौदल तळावर हल्ला व २०१२ मध्ये तुरूंग फोडून वायव्य प्रांतातील बान्नू येथून ४०० कैद्यांना मुक्त करण्यात तो सहभागी होता. साजना हा शिकलेला नाही, पारंपरिक व धार्मिक शिक्षणही त्याच्याकडे नाही पण तो कडव्या मनोवृत्तीचा आहे व त्याला अफगाणिस्तानात लढण्याचा अनुभव असल्याचे सांगितले जाते.