पाकिस्तानमधील लाहोर शहरामध्ये एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मांजरीच्या पिल्लावर सामूहिक आत्याचार केल्याची घृणास्पद घटना घडली आहे. एका १५ वर्षीय मुलानं मित्रासोबत मिळून हे कृत्य केलं आहे. त्यांनी आठवडाभर मांजरीवर अत्याचार केल्याचं स्थानिक वृत्तवाहिनीनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. एका स्थानिक एनजीओनं ही बाब फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर ही घटना समोर आली.

JFK Animal Rescue And Shelter या पाकिस्तानमधील स्वयंसेवी संस्थेनं (एनजीओ) या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. एनजीओनं आपल्या फेसबुक पेजवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, मांजरीच्या पिल्लाला सामूहिक अत्याचारामुळे अनेक ठिकाणी गंभीर दुखापत झाली. स्थानिक वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार या घटनेनंतर त्या मांजरीचा मृत्यु झाला आहे.

मांजरीला उपचारासाठी जेव्हा पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात स्पर्म, रक्त आणि प्लास्टिक आढळून आलं. मांजरीवरील आत्याचाराचे हे कृत्य एवढं भयंकर आहे की, यामुळे माणुसकीला देखील काळीमा फासला गेला आहे, असं सांगत संपूर्ण घटनेबाबत सर्वच स्थानिक लोकांमधून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

फेसबुक पोस्टमध्ये लिहण्यात आलेय की, मांजरीवर अत्यंत वाईट पद्धतीने अत्याचार करण्यात आला होता. पण पशुवैद्यकीय डॉक्टरांनी याबाबत लिखित स्वरुपात देण्यास नकार दिला. कारण, या भयंकर घटनेत त्यांना कोणत्याही प्रकारे सामील व्हायचं नव्हतं. फेसबुक पोस्टमध्ये असंही म्हटलंय की, पाकिस्तानमधील मुलांना लैगिंक शिक्षणाची गरज आहे. पण काही लोक याच्या विरोधात आहेत.

या घृणास्पद घटनेनंतर दोषी मुलांविरोधात पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात कारवाईची मागणी होत आहे. शाळेत लैगिंक शिक्षण देण्यात यावं, अशी मागणी काही आधिकाऱ्यांनी केली आहे. त्याशिवाय जनावरांवर आत्याचार करणाऱ्याविरोधात कायदा करण्यात यावा, अशीही मागणी होत आहे. या घटनेनंतर ट्विटरवर लाहोर हॅशटॅग ट्रेंड होत आहे.