News Flash

किती पाकिस्तानींना भारतानं दिलं नागरिकत्व? सीतारामन यांनी दिलं उत्तर

सीतारामन यांनी शरणार्थींना देण्यात आलेल्या नागरिकत्वाची आकडेवारीच जाहीर केली

पाकिस्तानी, बांगलादेशी आणि अफगाणिस्तानी नागरिकांना नागरिकत्व देण्याच्या कायद्यावरून देशात गदारोळ सुरू असतानाच गेल्या सहा वर्षांत किती अशा शरनार्थींना आतापर्यंत देण्यात आलं? या प्रश्नाचं उत्तर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं आहे.

चेन्नई येथील एका कार्यक्रमात सीतारामन बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी शरणार्थींना देण्यात आलेल्या नागरिकत्वाची आकडेवारीच जाहीर केली. त्यांनी सांगितले की, ”२०१६ ते २०१८ या काळात पाकिस्तानच्या १,५९५ आणि अफगाणिस्तानच्या ३९१ मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं आहे. २०१६ साली प्रसिद्ध गाय अदनान सामी याला भारतीय नागरिकत्व देण्यात आलं होतं. हे एक केवळ उदाहरण आहे. याशिवाय तस्लिमा नसरीन यांचंही उदाहरण आहे. यावरून स्पष्ट होतं की आमच्या सरकारवर लावण्यात येत असलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.”

पाकिस्तानी किती, बांगलादेशी किती?
सीतारामन यांनी स्पष्ट केलं की, ”गेल्या सहा वर्षांमध्ये २,८३८ पाकिस्तानी, ९१४ अफगाणिस्तानीत आणि १७२ बांगलादेशी शरणार्थींना भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. यामध्ये काही मुस्लीम धर्मियांचाही समावेश आहे.” याशिवाय त्या म्हणाल्या की, ”१९६४ पासून २००८ सालापर्यंत श्रीलंकेतून आलेल्या जवळपास चार लाख तमिळींना भारतीय नागरित्व बहाल करण्यात आलं आहे. २०१४ पर्यंत पाक, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून आलेल्या ५६६ मुस्लिमांनाही भारताचं नागरिकत्व मिळालं होतं.”

सुधारित नागिरकत्व कायद्याबद्दल सीतारामन यांची काय भूमिका?
सुधारित नागिरकत्व कायद्याबद्दल सीतारामन यांनी भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, ”जनतेचं आयुष्य सूसह्य करणं हा आमचा उद्देश आहे. कोणत्याही व्यक्तीचं नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही. उलट हा कायदा नागरिकत्व देणारा कायदा आहे.”

पाकिस्तानी शरणार्थिंची स्थिती काय?
”पूर्व पाकिस्तानातून आलेले लोक सध्या देशातील विविध शिबिरांमध्ये राहताहेत. तुम्ही जर ही शिबिरं पाहिली तर तुम्हाला अश्रू अनावर होतील. श्रीलंकन शरणार्थिंचीही हीच स्थिती आहे. त्यांना मूलभूत सूविधाही नाहीत,” असेही निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2020 4:14 pm

Web Title: pakistanis afghans bangladeshis given indian citizenship in last six years says nirmala sitharaman pkd 81
Next Stories
1 संघाचा सत्ताकेंद्रावर नव्हे राज्यघटनेवर विश्वास – मोहन भागवत
2 काश्मीरमध्ये घाणेरडे सिनेमे पाहण्यासाठी इंटरनेटचा वापर होतो; नीती आयोगाच्या सदस्याचे अजब विधान
3 लोकप्रिय अभिनेत्रीने केला आत्महत्येचा प्रयत्न
Just Now!
X