News Flash

Hafiz Saeed: … तर काश्मीर पाकिस्तानचा होईल, हाफिज सईदने ओकली गरळ

काश्मिरमधल्या लोकांचे जे विचार आहेत तेच आपलेसुद्धा आहेत. आपण जर यांना पाठिंबा दिला तर लवकरच काश्मीर पाकिस्तानाचा एक भाग होईल.

| July 14, 2016 02:13 pm

दहशतवादी हाफिज सईद. (संग्रहित छायाचित्र)

जमात-उद-दवाचा म्होरक्या हाफिज सईद यांने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून जे दंगे सुरू आहेत त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे, अशा स्वरूपाचे प्रक्षोभक भाषण हाफिज सईदने लाहोरमधल्या एका सभेत केले.
‘काश्मिरी जनात आता रस्त्यावर उतरली आहे. त्यांनी सुरू केलेल्या या बंडखोरीने भविष्यात चळवळीचे रूप घेतले पाहिजे. काश्मीरमधल्या सगळ्या छोट्या मोठ्या गटाने एकत्र येण्याची वेळ आता आली आहे. हुरियतच्या सगळ्या छोट्या मोठ्या गटाने एकजूट झाले पाहिजे. गेल्या काही दिवसांत काश्मीरमधल्या दंग्यात जितके लोक मारले गेलेत. त्यांच्या प्राणांची आहुती वाया जाऊ देऊ नका’ असे हाफिज सईदने सभेमध्ये म्हटले आहे.
‘काश्मिरमधल्या लोकांचे जे विचार आहेत तेच आपलेसुद्धा आहेत. आपण जर यांना पाठिंबा दिला तर लवकरच काश्मीर पाकिस्तानाचा एक भाग होईल, ही चळवळ आता राष्ट्रीय पातळीवर नेली पाहिजे आणि पाकिस्तान सरकारला देखील यात लक्ष घालायला भाग पाडले पाहिजे अशीही गरळ त्याने सभेमध्ये जमलेल्या जनतेसमोर ओकली. 
हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान मुज्जफर वाणी याला भारतीय सैन्याने ठार केल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती अधिकच चिघळली आहे. या दंग्यात आतापर्यंत ३० लोकांचा मृत्यू झाला तर कित्येक जण जखमी झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 1:41 pm

Web Title: pakistanis should support kashmiri brothers hafiz saeed
Next Stories
1 शीख तरुणाला ‘विम्बल्डन’च्या रांगेतून बाहेर काढले
2 प्राण्यांसाठी थंडा थंडा कूल कूल ट्रीट
3 Syed Akbaruddin: संयुक्त राष्ट्रसंघातील सभेत भारताच्या सय्यद अकबरूद्दीन यांनी काढली पाकची खरडपट्टी
Just Now!
X