19 September 2020

News Flash

पहिल्या शीख पोलीस अधिकाऱ्याला पाकिस्तानात अपमानास्पद वागणूक

त्यांना लाहोरमधील आपल्या राहत्या घरातून कुटुंबासह जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले असून त्यांच्या डोक्यावरील पगडी काढून टाकत त्यांचे बांधलेले केसही जबरदस्तीने सोडण्यात आले.

पाकिस्तानमध्ये काही कट्टरवाद्यांकडून सध्या शीख धर्मियांना टार्गेट केले जात असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नुकत्याच घडलेल्या एका ताज्या घटनेत पाकिस्तानातील पहिला शीख पोलीस अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या गुलाब सिंग यांच्याशी स्थानिक पोलिसांनीच असभ्य वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांना लाहोरमधील आपल्या राहत्या घरातून कुटुंबासह जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले असून त्यांच्या डोक्यावरील पगडी काढून टाकत त्यांचे बांधलेले केसही जबरदस्तीने सोडण्यात आले.

सिंग यांनी आरोप केला आहे की, शीख समाजाविरोधात पाकिस्तानमध्ये सध्या विद्वेषाचे वातावरण असून त्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. लाहोर शहरातील डेरा चहल या माझ्या राहत्या घरातून स्थानिक पोलिसांनी मला कुटुंबासह जबरदस्तीने बाहेर काढले. तसेच माझी पगडी जबरदस्तीने डोक्यातून काढत बांधलेले केसही मोकळे करण्यात आले.

या प्रकरणाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला असून यामध्ये सिंग यांची स्थानिक पोलिसांशी झटापट सुरु आहे. आपल्याला घर सोडण्यासाठी काही कालावधी देण्यात यावा अशी ते मागणी करीत आहेत. मी येथे १९४७ पासून राहत असून मला घराबाहेर निघण्यासाठी कमीत कमी दहा मिनिटांचा अवधी तरी द्यावा अशी विनंती ते करताना दिसत आहेत. आपल्याला घरातून कुठल्या कारणासाठी बाहेर काढण्यात आले याचे कोणतेही कारण देण्यात आले नाही किंवा कुठलीही नोटीस पाठवण्यात आली नसल्याचे सिंग यांनी सोशल मीडियात पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत म्हटले आहे.

पाकिस्तानात सध्या अल्पसंख्यांकांवर अनेक अन्याय अत्याचार सुरु आहेत. त्यामुळे त्यांची परिस्थिती अतिशय वाईट बनली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तर ही स्थिती आणखीनच बिघडली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार, पाकिस्तानाची गुप्तचर संस्था आयएसआयने खासकरुन शीख तरुणांना टार्गेट केले असून त्यांना भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचबरोबर अल्पसंख्यांकांमधील धार्मिक नेत्यांना जबरदस्तीने इस्लाम कबूल करण्यास भाग पाडले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 12:09 am

Web Title: pakistans first sikh police officer gulab singh was forcibly evicted from his house in lahore says was forced to open my turban untie my hair
Next Stories
1 काश्मीरवरील संयुक्त राष्ट्राच्या वादग्रस्त अहवालामागे पाकिस्तानी व्यक्तीचा हात
2 मजुरी मिळाली नाही म्हणून महिलांनी मुख्यमंत्र्यांचा बनवला ‘फुटबॉल’
3 जयंत सिन्हांविरोधात ऑनलाइन याचिका, राहुल गांधींकडून पाठिंब्याचे आवाहन
Just Now!
X