पाकिस्तानचा माजी दिग्गज हॉकी खेळाडू मंसूर अहमद याने हृदय प्रत्यारोपणासाठी भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. पाकिस्तानच्या विश्वचषक विजेत्या संघाचा हिस्सा राहिलेल्या मंसूरला उपचारासाठी भारतीय व्हिसाची गरज आहे. त्यामुळे सुषमा स्वराज यांनी त्याला वैद्यकिय व्हिसा देण्यास मदत करावी अशी त्याची इच्छा आहे.

एका व्हिडीओद्वारे मंसूरने भारत सरकारकडे भावूक विनंती केली आहे. ‘भारताविरोधात खेळताना अनेकदा भारतीयांचा हिरमोड केला. अनेकदा भारतीयांच्या हातातोंडातून विजय पळवला. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये भारताच्या हातून विजय हिसकावला आहे, त्यांच्या आनंदावर विरजण टाकण्याचं काम खूप वेळेस केलं. पण आज मला हृदय शस्त्रक्रीयेसाठी भारत सरकारच्या मदतीची गरज आहे. वैद्यकीय व्हिसा मला नवं जीवन देऊ शकतो, जर मला व्हिसा मिळाला तर मी नेहमीच भारताचा आभारी राहिल’ अशी विनंती मंसूरने व्हिडीओद्वारे केली आहे.

भारताचा माजी महान खेळाडू धनराज पिल्ले याला भेटायची इच्छाही त्याने व्हिडीओमध्ये व्यक्त केली आहे. 49 वर्षांच्या मंसूरने तीन वेळेस ऑलंपिकमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे.

पाहा व्हिडीओ –