नवी दिल्ली : पाकिस्तानातील वाढती कट्टरता आणि धार्मिक असहिष्णुतेमुळे हजारो अल्पसंख्यांक ख्रिश्चन, अहमदी मुस्लिम आणि हिंदू लोकांना स्थलांतराशिवाय पर्याय राहिलेला नाही. एका अहवालानुसार, इस्लामिक कट्टरपंथी समुहांद्वारे धार्मिक अत्याचारांना रोखण्यासाठी सरकारच्या निष्क्रियतेमुळे पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांमध्ये खुपच असंतोष पसरला आहे. त्याचबरोबर येथे नास्तिकही सुरक्षित नाहीत.

https://twitter.com/ani_digital/status/953582268550754304

अहमदिया समुदाय इस्लाम धर्माचा भाग असतानाही पाकिस्तानात धोक्यात आहे. त्यांना उघडपणे येथे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या संविधानानुसार, य़ेथे अहमदिया लोकांना मुसलमान म्हणून मान्यता नाही.

पाकिस्तानातील जे नागरिक नास्तिक आहेत त्यांच्या जीवनालाही मोठा धोका आहे. यांतील अनेक लोकांनी आपले अपहरण होण्याच्या भीतीने सोशल मीडियावरून आपले प्रोफाईलही डिलीट केले आहे. आपले विचार प्रकट करण्यासाठी ते आपले घर आणि इंटरनेटलाही सुरक्षित जागा मानत नाहीत.

स्थानिक व्यक्ती जर नास्तिक असली तर ती मुसलमान असल्यावरुन सुटू शकते मात्र, हिंदू आणि ख्रिश्चन लोक तर उघडपणे निशाण्यावर आहेत. क्वेट्टातील बेथल मेमोरियल मेथोडिस्ट चर्चमध्ये नुकत्याच झालेल्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यामुळे ही बाब आधोरेखित होते.

मुस्लिम कट्टरपंथीयांच्या धमक्यांमुळे अनेक ख्रिश्चन लोकांना पाकिस्तानातून स्थलांतर करुन इतर ठिकाणी शरण जावे लागले आहे.