News Flash

पाकिस्तानला कमी लेखू नका, पाकचे मावळते लष्करप्रमुख राहिल शरीफ यांची भारताला धमकी

भारतामुळे प्रदेशात धोका निर्माण झाला आहे असे शरीफ म्हणालेत.

मंगळवारी पाकिस्तानचे नवनियुक्त लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी मावळते लष्करप्रमुख राहिल शरीफ यांच्याकडून पदभार स्वीकारला.

पाकिस्तानने नेहमी संयमी धोरण स्वीकारले आहे. पण यावरुन भारताने पाकला कमी लेखू नये अन्यथा ते महागात पडेल अशी धमकीच पाकिस्तानचे मावळते लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांनी दिली आहे. तर नवनिर्वाचित लष्कर प्रमुख कमर बाजवा यांनी सीमारेषेवरील परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल असे म्हटले आहे.

मंगळवारी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहिल शरीफ हे निवृत्त झाले. रावळपिंडीमधील सैन्याच्या मुख्यालयातील स्टेडियममध्ये शरीफ यांनी सैन्याला उद्देशून शेवटचे भाषण केले. या भाषणात त्यांनी भारताचाही उल्लेख केला. भारताने संपूर्ण प्रदेशात अशांत आणि हिंसक वातावरण निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला. काश्मीमध्ये भारताचा आक्रमक पवित्रा आणि दहशतवादाला खतपाणी दिल्याने प्रदेशात धोका निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. भारताला धमकावण्याच्या स्वरात शरीफ म्हणाले, भारताने पाकिस्तानला कमी लेखू नये. अन्यथा हे त्यांनाच महागात पडेल.

काश्मीर प्रश्नावर तोडगा काढल्याशिवाय दक्षिण आशियामध्ये शांतता प्रस्थापित होणार नाही. आंतरराष्ट्रीय संघटनांनी या प्रश्नात दखल देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात शरीफ यांच्याकडून कमर बाजवा यांनी लष्कर प्रमुखपदाचा कार्यभारही स्वीकारला. पदभार स्वीकारताना भारताविषयी बाजवा म्हणाले, सीमारेषेवरील परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल. बाजवा हे पाकिस्तानचे १६ वे लष्करप्रमुख आहेत. पाकव्याप्त काश्मीरविषयी त्यांचा गाढा अभ्यास आहे.

पाकिस्तानी राजकारणात लष्कराला मोठे महत्त्व आहे. पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्योत्तर काळातील निम्म्यापेक्षा अधिक वर्षांत सत्ता लष्कराच्या हाती राहिली आहे. त्यामुळे हे शक्तिशाली पद कोणाला मिळते याकडे सर्वाचे लक्ष होते. त्यात अन्य चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाजूला सारून बाजवा यांची निवड झाली आहे. पाकिस्तानचे नवनियुक्त लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांना त्यांच्या लोकशाहीवादी, संयत आणि मध्यममार्गी पाश्र्वभूमीचा फायदा झाला असे सांगितले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 5:53 pm

Web Title: pakistans new army chief vows to improve situation along loc
Next Stories
1 पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर; ओबामा, ट्रम्प, पुतीन यांना टाकले मागे
2 दहशतवाद्यांशी लढताना पंढरपूरचे मेजर कुणाल गोसावी शहीद
3 सुशील मोदी, तुमच्या बहिणीचे नितीशकुमारांशी लग्न लावून द्या; राबडीदेवींची जीभ घसरली
Just Now!
X