21 September 2020

News Flash

पाकिस्तानचा धार्मिक द्वेष पसरवून देश तोडण्याचा डाव : राजनाथ सिंह

पाकिस्तानकडून वारंवार भारताला तोडण्याचे प्रकार सुरु असून सीमेपलिकडून वारंवार गोळीबारही केला जात आहे. मात्र, आपले जवान त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत.

पाटणा : पाकिस्तानचा धार्मिक द्वेष पसरवून देश तोडण्याचा डाव असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्र राजनाथ सिंह यांनी रविवारी एका जहीर कार्यक्रमात केला.

पाकिस्तानकडून वारंवार भारताला तोडण्याचे प्रकार सुरु असून त्यांच्याकडून धार्मिक विद्वेषही पसरवला जात आहे. सीमेपलिकडून वारंवार गोळीबारही केला जात आहे. मात्र, आपले जवान त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. मात्र, याची काळजी करु नका कारण त्यांना पुन्हा जागेवर आणण्याची आपल्यात धमक आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ते बिहारमधील पटना येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते.


पाकिस्तानला इशारा देताना राजनाथ म्हणाले, देशातील हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे काम करु नका. कारण, भगतसिंह आणि चंद्रशेखर आझाद यांनी देशासाठी बलिदान दिले तसेच अश्फाकउल्लाह खान यांनी देखील भारतासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. पाकिस्तानकडून कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही देशाचे शिर कधीही झुकू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी आपल्या भाषणात देशवासियांना उद्देशून दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2018 4:35 pm

Web Title: pakistans religious hatred spreads through break the nation says rajnath singh
Next Stories
1 अण्णा हजारेंचे गाव राळेगणसिद्धीचा सर्वांनी आदर्श घ्यावा : पंतप्रधान
2 भारतीय एअरपोर्ट्सला मिळाली पहिली महिला फायर फायटर
3 ‘मी पक्ष सोडणार नाही, कारवाई करुन दाखवा’; शत्रुघ्न सिन्हांचं आव्हान
Just Now!
X