News Flash

संयुक्त राष्ट्रात भारताने इस्रायलबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे पॅलेस्टाइनची नाराजी; परराष्ट्रमंत्र्यांना लिहिले पत्र

भारताचे दुर्लक्ष मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या मानवाधिकार परिषदेच्या कामात अडथळा आणत आहे

फोटो सौजन्य- AP

इस्रायल- पॅलेस्टाइन यांच्यामध्ये सुरु असलेल्या संघर्षाला काही दिवसांपूर्वी युद्धविराम मिळाला. ११ दिवस दोन्ही ठिकाणी युद्धसदृश्य परिस्थिती होती. दरम्यान, संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार समितीत गाझा येथे झालेल्या हिंसाचाराचाबाबत इस्रायलविरुद्ध चौकशी करण्याच्या प्रस्तावावर भारताकडून प्रतिसाद न आल्याने पॅलेस्टाइनने नाराजी दर्शवली आहे. यासंदर्भात पॅलेस्टाइने भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे. या प्रस्तावाच्या मतदानावेळी उपस्थित न राहून भारताने एक महत्त्वाची संधी गमावली आहे असे या पत्रात म्हटले आहे.

प्रजासत्ताक भारताने युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काऊन्सिलमध्ये इस्रायलविरोधात चौकशीसाठी आणलेल्या निर्णायक आणि महत्त्वपूर्ण मतदानाच्या ठरावादरम्यान गैरहजर राहून एक महत्त्वाची संधी गमावली. संयुक्त राष्ट्रातर्फे इस्रायलची चौकशी करण्यात येणार होती पण भारत या बैठकीत गैरहजर राहिला, असे रियाद अल-मल्की यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांना लिहिलेल्या पत्र म्हटले आहे.

इस्त्रायच्याविरोधात आणलेल्या प्रस्तावादरम्यान मतदानावेळी भारत त्या १४ देशांमध्ये होता ज्यांनी इस्त्रायल विरोधात मतदान केलं नव्हतं. भारत मतदानावेळी अनुपस्थित होता. त्यामुळे पॅलेस्टाइने भारताविरोधात नाराजी दर्शवली आहे. २७ मे रोजी जिनिव्हामध्ये झालेल्या या मतदानावेळी २४ सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने तर ९ सदस्यांनी प्रस्तावाविरोधात मतदान केले.

इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्षावर संयुक्त राष्ट्रांमध्ये याआधीदेखील भारताने आपली भूमिका स्पष्ट केली होती. भारताने गाझा येथील रॉकेट हल्ल्यांमुळे होत असलेल्या हिंसाचाराचा तीव्र निषेध नोंदवला होता.

नक्की वाचा>> इस्त्रायल वि. पॅलेस्टाइन : सगळं कुटुंब संपलं पण आईच्या कुशीत असल्याने ५ महिन्याचं बाळ वाचलं

“मी २७ मे २०२१ रोजी झालेल्या मानवाधिकार परिषदेच्या ३० व्या विशेष सत्राच्या अंतिम सत्रात प्रजासत्ताक भारताने घेतलेल्या भूमिकेबद्दल आपली चिंता व्यक्त करण्यासाठी लिहित आहे. पूर्व जेरुसलेम आणि इस्त्राईलसह व्यापलेल्या पॅलेस्टाईन प्रदेशातील आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याबद्दल आदर सुनिश्चित करण्यासाठी पत्र लिहित आहे, ”अल-मलिकी यांनी ३० मे रोजी जयशंकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

“हा ठराव मानवी हक्क परिषदेचे उल्लंघन नाही. व्यापक बहुपक्षीय सल्ला घेण्यासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. वर्षानुवर्षे इस्रायलने राज्ये, संयुक्त राष्ट्राच्या तज्ञ, मानवाधिकार कराराच्या संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कायद्यांचे उल्लंघनांबद्दल संपूर्ण तपासणी आणि अहवाल देण्यासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे,” असे अल-मलिकी यांनी सांगितले.

नक्की वाचा >> नेतान्याहू यांनी मानले समर्थक देशांचे आभार; मात्र भारताचा पडला विसर

“आपले या प्रस्तावावरील दुर्लक्ष सर्वांसह पॅलेस्टाईनमधील लोकांच्या मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या मानवाधिकार परिषदेच्या महत्त्वपूर्ण कामात अडथळा आणत आहे. पॅलेस्टाईनमधील लोकांना सार्वभौमतेच्या तत्त्वापासून वगळण्यात आले आहे. न्याय व शांतीची त्यांना आवश्यकता आहे. पॅलेस्टाईनमधील लोकांवर होणाऱ्या अन्यायाचे मूळ कारण निर्वासन, विस्थापन, वसाहतवाद, दडपशाही आणि इस्रायलने त्यांच्या प्रत्येक मानवाधिकारांचे केलेल उल्लंघन. ही परिस्थिती केवळ अस्थिरच राहणार नाही,तर दूरगामी आणि गंभीर परिणामांनी सतत आणखी वाईट होत जाईल,”असे अल-मलिकी म्हणाले. भारत, फ्रान्स, इटली, जपान, नेपाळ, नेदरलँड्स, पोलंड आणि दक्षिण कोरिया हे देश या प्रस्तावाच्या मतदानाला उपस्थित नव्हते.

समजून घ्या : इस्त्रायचं रॉकेट हल्ल्यांपासून संरक्षण करणारं आयर्न डोम आहे तरी काय?

दरम्यान, ११ दिवस चाललेल्या युद्धादरम्यान गाझामधील २३२ पॅलेस्टीनी नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ६५ मुलांचाही समावेश आहे. १९०० जण जखमी झाले आहेत. इस्रायलने केलेल्या दाव्यानुसार त्यांनी पॅलेस्टाइनच्या बाजूने लढत असणाऱ्या किमान १६० जणांना खात्मा केलाय. इस्रायलमध्येही १२ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 10:06 am

Web Title: palestine resents india stance on israel at un letter to the minister of foreign affairs abn 97
Next Stories
1 सरकार ‘बायोलॉजिकल-ई’ला ३० कोटी डोससाठी देणार १५०० कोटी
2 करोनामुळे लोकप्रियता कमी झाली असली तर पुन्हा मोदीच सत्तेत येणार; मेहुल चोक्सीचा दावा
3 व्हॉट्सअ‍ॅपवर होणार करोनाचे निदान, XraySetu अ‍ॅप लाँच; समजून घ्या कशी आहे प्रक्रिया
Just Now!
X