News Flash

Pampore Encounter: पम्पोर हल्ला: तिसऱ्या दिवशी लष्कराचे ऑपरेशन संपुष्टात, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

पम्पोरच्या या इमारतीवर दहशतवादी हल्ला होण्याची ही दुसरी वेळ आहे.

Pampore Attack: सोमवारी दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला होता. छायाचित्र: शोएब मसुदी

जम्मू काश्मीरमधील पम्पोर येथील ईआयडी या सरकारी इमारतीत लपलेल्या दोन दहशतवाद्यांचा बुधवारी तिसऱ्या दिवशी खात्मा करण्यात लष्कराला यश आले. लष्कराने हे ऑपरेशन आता संपुष्टात आणले आहे. सोमवारी (दि.१०) सकाळी हे दहशतवादी या इमारतीत घुसले होते. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ४८ तासांपासून काही अंतराने चकमक उडत होती. या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. या इमारतीत दोन ते तीन दहशतवादी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. सोमवारी दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला होता. पम्पोरच्या या इमारतीवर दहशतवादी हल्ला होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही दहशतवाद्यांनी या इमारतीला आपला निशाणा बनवले होते.
दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलाने इमारतीवर रॉकेट लाँचर आणि ग्रेनेडचा मारा केला. हा संपूर्ण भाग सुरक्षा दलांनी वेढला आहे. तत्पूर्वी दहशतवाद्यांनी सोमवारी इमारतीत प्रवेश केल्यानंतर सुरक्षा दलाचे लक्ष विचलित करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या खोलीमधील गाद्यांना आग लावली होती. आग लागल्यानंतर सुरक्षा दल काही क्षणातच तिथे आले होते. त्यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांनावर गोळीबार केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 10:19 am

Web Title: pampore encounter at edi complex enters day three one militant dead
Next Stories
1 हत्येपूर्वी मोनिकाला पॉर्न क्लिप दाखवून बलात्कार केल्याची मारेकऱ्याची कबुली
2 Surgical Strikes: सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे न जाहीर करण्याचा केंद्राचा निर्णय
3 यूएस ओपन : वेडामागचं शहाणपण
Just Now!
X