निर्णयाचे पुनरावलोकन करण्याची मागणी

पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून पायउतार करण्यात आलेल्या नवाज शरीफ यांनी पनामा पेपर प्रकरणाबाबत तीन वेगळ्यावेगळ्या अपील दाखल केल्या आहेत. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे.

न्यायालयाच्या ऐतिहासिक आदेशामुळे शरीफ यांना आपली संपत्ती आणि संयुक्त अरब अमिरातचा इकमा छापण्यासाठी आयोग्य घोषित करण्यात आले होते.

शरीफ यांच्यातर्फे वकील ख्वाजा हरिस यांनी न्यायालयामध्ये तीन अपील दाखल केल्या आहेत. अपीलमध्ये माजी पंतप्रधान शरीफ यांनी न्यायालयाने आपल्या निर्णयाचे पुनरावलोकन करावे, अशी मागणी केली आहे.

आम्ही २०१३च्या निकालादरम्यान अर्ज करताना आपली कागदपत्रे गुप्त ठेवली नव्हती. यामुळे न्यायालयाने अप्रामाणिक आणि अविश्वसनीय घोषित केले आहे. संविधानाच्या कलम १८८ अंतर्गत फिर्याद नसताना अपात्र घोषित करता येऊ शकत नसल्याचे शरीफ यांनी आपल्या अर्जामध्ये म्हटले आहे.

२०१३च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नामांकनपत्रात अवास्तव वेतन आणि संपत्ती यांची माहिती न दिल्याने २८ जुलैच्या ऐतिहासिक निर्णयात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सर्वसंमतीने शरीफ यांना अयोग्य घोषित केले होते.