पनामा कागदपत्रांत ५०० भारतीयांची नावे उघड झाली असली तरी त्यापैकी काही व्यावसायिक व कंपन्यांना भारताच्या प्राप्तिकर खात्याने परदेशांतील मालमत्तेची आणि व्यवहारांची माहिती मागवण्यासाठी यापूर्वीच नोटिसा बजावल्या होत्या. मात्र त्या कंपन्या व कर नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशांकडून माहिती मिळवताना भारताला अनेक अडचणींना समोरे जावे लागले.

त्यात कान्सू कॉर्पोरेशन, क्लेअर कन्सल्टंट्स, झर्पिन होल्डिंग्ज, ब्रॅगमार इक्विटीज, एसटीआय युनायटेड कॉर्पोरेशन या कंपन्यांचा समावेश होता.